विशेष प्रतिनिधी, पुणे
सध्या पावसाळा सुरू असून कधी कधी मुसळधार पाऊस पडून रस्ते जलमय होतात, जणू काही त्यांना तलावांचे स्वरूप प्राप्त होते. त्यामुळे रहदारी थांबते आणि ट्रॉफीक जाम होते. इतकेच नाही तर अशा वेळी दुचाकी चालक किंवा कार चालकांना या रस्त्यात अनेक लहान-मोठ्या खड्ड्यांचा सामना करावा लागतो. यामुळे वाहनाचे नुकसान देखील होते, तसेच स्वत: जिवाला होण्याचा धोका देखील असतो. त्यामुळे आपल्याकडे कार असेल आणि आपण पावसाळ्यात वाहन चालवत असाल तर आपण सुरक्षिततेशी संबंधित काही गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे. त्यामुळे पावसाळ्यात कार सेफ्टी टिप्स काय आहेत ते जाणून घेऊ या…
आवश्यक तेव्हाच घराबाहेर पडा
हवामान खराब असेल किंवा मुसळधार पाऊस पडत असेल तर घरीच राहण्याचा निर्णय घ्यावा, कारण अशा हवामानात कारसह रस्त्यावर असणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे तातडीची गरज असेल तेव्हाच घरा बाहेर वाहन घेऊन जावे.
वाहने नीट चालवा
आपण पावसाळ्यात दुचाकी किंवा कार चालवितो, तेव्हा स्वतःची आणि इतरांची काळजी घ्यावी. अशा हवामानात रस्त्यावर सर्वत्र पाणी असते, म्हणून हळू वाहने चालवा जेणेकरून आपल्या वेगामुळे दुचाकी किंवा कारचे टायर फुटणार नाहीत.
जुने टायर बदला
खराब झालेल्या जुन्या टायर्ससह रस्त्यावर वाहन चालविणे धोकादायक आहे, कारण यामुळे वाहन घसरण्याचा धोका असून ते घातक ठरू शकते. म्हणूनच आपल्या वाहनाचे जुने टायर बदलणे योग्य आहे.
ब्रेक सिस्टम
कारची ब्रेक सिस्टम योग्य आणि मजबूत असेल तर बर्याच प्रकारचे अपघात टाळता येतील. पावसाळ्यात वाहन चालकांना त्यांच्या कारची ब्रेक सिस्टम कशी असते हे पहावे लागते. बर्याच कारच्या दोन्ही बाजूला ब्रेक नसतात. अन्यथा आपण खराब रस्त्यांवर वाहन वेगाने चालवू नये.
वेळेचे व्यवस्थापन
रस्त्यावर वेगाने वाहन चालविणाऱ्यांचे वेळेचे व्यवस्थापन अत्यंत वाईट असते. कारण उशिरा घरी जाण्यासाठी निघल्यास रस्त्यावर वेगाने वाहन चालवावे लागते. या परिस्थिती घाई प्राणघातक ठरू शकते.









