इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुनागड जिल्ह्यातील गीर वन्यजीव अभयारण्यात आज भेट दिली. ३ मार्च रोजी जागतिक वन्यजीव दिनानिमित्त राष्ट्रीय वनजीव मंडळाच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. या बैठकीपूर्वी मोदींनी सकाळी जंगल सफारीचा आनंद लुटला.
या सफारीनंतर मोदी यांनी सांगितले की, आज सकाळी WorldWildlifeDay निमित्त, मी गीरमध्ये सफारीला गेलो, जिथे आपण सर्वजण जाणतो की, भव्य आशियाई सिंहांचे निवासस्थान आहे. गीरमध्ये आल्याने मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना एकत्रितपणे केलेल्या कामाच्या अनेक आठवणी ताज्या होतात. गेल्या अनेक वर्षांत, सामूहिक प्रयत्नांमुळे आशियाई सिंहांची संख्या सातत्याने वाढत आहे. आशियाई सिंहांचे अधिवास जपण्यात आदिवासी समुदाय आणि आसपासच्या भागातील महिलांची भूमिका तितकीच कौतुकास्पद आहे.
गेल्या दशकात, वाघ, बिबटे, गेंडे यांची संख्या देखील वाढली आहे, ज्यावरून आपण वन्यजीवांना किती प्रेम करतो आणि प्राण्यांसाठी शाश्वत अधिवास निर्माण करण्यासाठी काम करत आहोत हे दिसून येते.