नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय संस्कृतीला प्राचीन इतिहास लाभलेला आहे. या देशावर अनेक परकीय आक्रमणे झाली. तरीही त्या देशाची संस्कृती टिकून आहे, इतिहास हा घडून गेलेला असतो तो बदलता येत नाही. त्यामुळे इतिहासाची पुनरावृत्ती करणे ही योग्य ठरत नाही, तसे करण्याचे प्रयत्न केल्यास दोन समाजामध्ये वैमनस्य निर्माण होऊ शकते आजच्या काळात सामंजस्याची गरज आहे, असे मत महान योगी तथा सदगुरु जग्गी वासुदेव यांनी व्यक्त केले आहे.
आजकाल ज्ञानवापी व्यतिरिक्त अनेक ठिकाणी मंदिर पाडून मशीद बांधण्याचा दावा केला जात आहे. दिल्लीच्या कुतुबमिनार आणि हैदराबादच्या मशिदीतही हिंदू देवतांच्या खुणा असल्याचे म्हटले जाते. दरम्यान, अध्यात्मिक गुरू जग्गी वासुदेव यांनी म्हटले आहे की, आक्रमणकर्त्यांनी जी हजारो मंदिरे उद्ध्वस्त केली त्याबद्दल बोलून काही उपयोग नाही.
भाविकांशी संवाद साधताना सद्गुरू म्हणाले, हल्ल्यादरम्यान हजारो मंदिरे पाडण्यात आली. मग आम्ही त्यांना वाचवू शकलो नाही. आता त्यांच्याबद्दल बोलण्यात अर्थ नाही कारण इतिहास पुन्हा लिहिता येत नाही. हिंदू, मुस्लिम या दोन्ही समुदायांनी एकत्र बसून एक करार केला पाहिजे की दोन किंवा तीन मुख्य ठिकाणी निर्णय घ्यावा.
प्रत्येक ठिकाणाविषयी पुन्हा पुन्हा बोलून दोन समाजात वैमनस्य निर्माण करून वाद निर्माण करणे योग्य नाही. काही मिळाले तर काही गमवावे लागेल आणि देशाला पुढे नेण्याचा हाच योग्य मार्ग आहे. या सर्व गोष्टी आपण हिंदू आणि मुस्लिमांमध्ये विभागलेल्या पाहू नये.
सद्गुरुंना ज्ञानवापीबद्दल विचारले असता त्यांनी याबाबत फारशी माहिती नसल्याचे सांगून टाळले. असा कोणताही वाद नाही जो सुटू शकत नाही, असे ते म्हणाले. नागरिकांच्या मनात काही दुःख असेल तर बसून बोला. यातून कोणाला राजकीय फायदा मिळू नये म्हणून जे सक्रिय राजकारणात आहेत त्यांना यापासून दूर ठेवले पाहिजे.