नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली येथे कर्तव्यपथावर झालेल्या प्रजास्त्ताक दिनानिमित्त संचलन सोहळ्यात महाराष्ट्र शासनाचा सहभाग अत्यंत नेत्रदीपक ठरला. महाराष्ट्राच्या साडेतीन शक्तीपीठे नारिशक्ती या चित्ररथाने सर्व उपस्थितांची आणि हा सोहळा दूरवर पाहणाऱ्या जगभरातील प्रेक्षकांची मने जिंकत सर्वोत्कृष्ट सादरीकरणाचा द्वितीय क्रमांक प्राप्त केला. या चित्ररथाचे महाराष्ट्रात सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
साडेतीन शक्तीपीठावर आधारित चित्ररथाचे प्रदर्शन सप्तश्रृंगी वणी येथे होणार असून या सप्तश्रृंगी वणी शक्तीपीठाच्या चित्ररथाचा सांस्कृतिक कार्यक्रम गुरुवार दि. १६ मार्च रोजी सकाळी ११ वाजता श्री सप्तश्रृंगी मंदिर, वणी, नाशिक येथे होणार आहे. नागरिकांनी व भावीकांनी या चित्ररथाच्या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.
Sadetin Saktipathe Saptashrungi Gad Chariot