मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – माहीम विधानसभा मतदार संघाचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर यांनी मनसे नेते राज ठाकरे व अमित ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी म्हटले की राज्यात भाजपचे सरकार सत्तेत येईल, मुख्यमंत्री जो होईल तो मनसे आणि भाजपच्या मदतीने होईल असे भाष्य केले होते. त्यावर सदा सरवणकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले की, अशी वैयक्तिक मते असतात. पण, ज्याचा एकही आमदार नाही त्यांनी मुख्यमंत्री कोण हे सांगणे हे किती हास्यास्पद आहे. त्यामुळे मी त्यांच्यावर टीका करावी असं मला वाटत नाही.
तु पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री कोण हे पुढे महायुती ठरवेल, मला एवढंच कळत. मी या मतदार संघातून उभा राहणार आहे. महायुतीची उमेदवार म्हणून मी निवडून येणार आहे. लोकांचा मला आशीर्वाद आहे. माहीम मतदार संघात सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. या मतदार संघातून मनसेचे अमित ठाकरे ह पहिल्यांदा निवडणूक लढवत आहे. त्यामुळे महायुतीने त्यांना पाठींबा देण्याच्या हालचाली सुरु केल्या. पण, सरवणकर यांनी निवडणूक लढवणारच असे सांगत प्रचारही सुरु केला आहे.
या मतदार संघात शिवसेना ठाकरे गटानेही उमेदवार उभा केला आहे. त्यामुळे येथील तिरंगी लढत ही चांगलीच चर्चेची ठरली आहे.