मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतरत्न आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने क्रिकेटमधील एका नियम बदलण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे, जगातील अव्वल फलंदाज असूनही सचिनने गोलंदाजांची बाजू घेणारा नियम बदलावा असे म्हटले आहे. त्याला कारण आहे ते सध्या इंग्लंडमध्ये सुरू असलेली अॅशेस मालिका.
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये सध्या चौथी कसोटी खेळली जात आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी अत्यंत विचित्र घटना घडली. बेन स्टोक्स फलंजादी करीत असताना त्याने चेंडू सोडण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी चेंडू हा पॅडला लागल्याचे सांगत ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी बादचे अपिल केले. त्यानंतर अम्पायरने स्टोक्सला बाद असल्याचे सांगत बोटवर केला. मात्र, स्टोक्सने तिसऱ्या अम्पायरकडे दाद मागितली. आणि एक धक्कादायक बाब समोर आली. ती म्हणजे, चेंडू बॅट किंवा पॅडला लागलाच नाही. तर, चेंडू थेट स्टम्पला लागला. मात्र, स्टम्पवरील बेल्स खाली पडल्या नाहीत. त्यामुळे स्टोक्सला नाबाद घोषित करण्यात आले. बघा या विचित्र घटनेचा हा व्हिडिओ
https://twitter.com/sachin_rt/status/1479321696054046721?s=20
याचीच दखल घेत सचिन तेंडुलकरने म्हटले आहे की, ही अत्यंत विचित्र घटना आहे. त्याने गोलंदाजांची बाजू घेतली आहे. त्यामुळेच यापुढे क्रिकेटमध्ये हिटिंग द स्टम्प्स हा नियम लागू करायला हवा. म्हणजेच, स्टम्पला चेंडू लागला आणि बेल्स पडल्या किंवा नाही तरी फलंदाजाला बेद ठरविण्यात यावे, असे स्पष्ट मत सचिनने व्यक्त केले आहे. त्यावर ऑस्ट्रेलियाचा अव्वल फिरकीपटू शेन वॉर्न यानेही प्रतिसाद दिला आहे. त्यानेही सचिनचे समर्थन केले आहे. तसेच, याबाबत आपण पुढाकार घेणार असल्याचे वॉर्नने सांगितले आहे.