नाशिक – कोरोनाच्या नवीन ओमिक्रोन स्ट्रेनचा धोका असल्यामुळे जिल्हा पोलिस अधिक्षक सचिन पाटील यांनी नागरिकांना सतर्क राहण्यासाठी एक पोस्टर तयार केले असून ते नागरिकांपर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठवले जात आहे. या पोस्टरमध्ये महाराष्ट्र राज्य सरकारची नवीन नियमावली आहे. ही नियमावली सर्वांपर्यंत सहज पोहचावी व नागरिकांनी हे नियम पाळावे यासाठी हे पोस्टर तयार करण्यात आले आहे.