शनिवार, ऑगस्ट 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय सुकाणू समितीमध्ये शिक्षण अभ्यासक सचिन जोशी यांची निवड

by Gautam Sancheti
फेब्रुवारी 6, 2025 | 5:44 pm
in स्थानिक बातम्या
0
SACHIN JOSHI

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र शासनाने राज्यस्तरीय सुकाणू समिती तयार केली असून या समितीमध्ये नवीन चार सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. या समितीमध्ये नाशिकचे शिक्षण अभ्यासक सचिन जोशी यांची निवड झाली असून शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या अनुभवाचा फायदा राज्यातील शिक्षण क्षेत्राला होऊ शकेल. सर्जनशीलता आणि अनुभवावर आधारित शिक्षण पद्धतीत त्यांनी मोठे काम केले असून याचाच फायदा नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करताना राज्यस्तरावर होऊ शकेल. सदस्यांच्या नियुक्तीने राज्याच्या शालेय शिक्षण व्यवस्थेच्या सुधारणेसाठी उपयोग केला जाणार आहे.

केंद्र सरकारने लागू केलेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अंतर्गत महाराष्ट्रात 5+3+3+4 शिक्षण संरचनेच्या अंमलबजावणीसाठी विविध पावले उचलली जात आहेत. त्यानुसार, अभ्यासक्रमाच्या पुनरावलोकनासह, शिक्षण गुणवत्ता सुधारण्यासाठी तज्ज्ञांचा सहभाग वाढवण्याच्या दृष्टीने सुकाणू समितीचे पुनर्रचना करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासन शिक्षण क्षेत्रातील उद्दिष्टांची प्रभावी अंमलबजावणी व नियोजनासाठी सुकाणू समिती गठीत करते. ही समिती शैक्षणिक धोरणांना दिशा देऊन निर्णय प्रक्रिया आणि अंमलबजावणी सुनिश्चित करते. सचिन जोशी यांनी शिक्षण क्षेत्रात विविध प्रयोगशील उपक्रम राबवत अभ्यासक दृष्टिकोनातून शिक्षणाला नवीन दिशा दिली आहे. तर ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ रमेश पानसे यांनी ज्ञानरचनावादाचा संकल्पना महाराष्ट्रात रुजवली आणि शिक्षण प्रक्रियेत चिंतन व प्रयोगशीलता यांना प्राधान्य दिले. तर शांतीलाल मुथा यांनी सामाजिक कार्यातून शिक्षण संस्कारक्षम बनवण्यासाठी महाराष्ट्रात काम केले.

नाशिकच्या सचिन जोशी यांच्यासह चार सदस्य
महाराष्ट्र शासनाच्या २४ मे २०२३ आणि २ जानेवारी २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार सुकाणू समितीमध्ये नवीन चार सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात नाशिकचे शिक्षण अभ्यासक सचिन जोशी यांच्यासह सेवानिवृत्त भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी नंद कुमार, ज्येष्ठ शिक्षणतज्ञ रमेश पानसे, समाजसेवी कार्यकर्ते शांतीलाल गुलाबचंद मुथा यांची निवड करण्यात आली आहे.

शिक्षण क्षेत्राला फायदा होईल
या निर्णयामुळे महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेत गुणवत्तापूर्ण सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. अनेक शिक्षण तज्ञांसोबत काम करण्याची संधी मला यानिमित्ताने मिळणार आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी काम करताना एकप्रकारे देश सेवेची संधी उपलब्ध होणार असून राज्याच्या शालेय शिक्षण धोरणात सकारात्मक बदल करण्यासाठी प्रयत्न केले जातील. सचिन जोशी, शिक्षण अभ्यासक

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिकमध्ये अवैधरित्या घुसखोरी करून राहणा-या आठ बांगलादेशी नागरीकांना अटक…

Next Post

नैसर्गिक आपत्तीमुळे बाधितांच्या बँक खात्यावर ५९२ कोटी ३४ लाख ९० हजाराची मदत डीबीटीद्वारे वर्ग…नाशिक विभागाला मिळाले इतक्या कोटीची मदत

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
maha gov logo

नैसर्गिक आपत्तीमुळे बाधितांच्या बँक खात्यावर ५९२ कोटी ३४ लाख ९० हजाराची मदत डीबीटीद्वारे वर्ग…नाशिक विभागाला मिळाले इतक्या कोटीची मदत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011