नाशिक – ऑल इंडिया मोटार ट्रान्संपोर्ट काँग्रेसचे वेस्ट झोन उपाध्यक्ष विजय कालरा यांच्या नेतृत्वाखाली मोटार मालक कामगार वाहतुक संघटनेचे उद्घाटन नाशिक जिल्यात नाशिक क्लब येथे करण्यात आले, ही संस्था संपूर्ण महाराष्ट्रात वाहतुकदारांना व कामगारांना त्यांचा हक्क मिळुन देण्यासाठी व त्यांच्या कल्याणासाठी काम करेल. महाराष्ट्रात वाहतुकदार व कामगार हा अत्यंत वाईट परिस्थितीतून आपला व्यवसाय करत आहे. व्यापारी, उद्योजक, प्रशासन हे महाराष्ट्रातील वाहतुकदार व कामगारांचे खूप मोठ्या प्रमाणात सोशण करत आहे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मोटर मालक कामगार वाहतुक संघटनाची स्थापना करण्यात आली.
या संघटनेच्या उद्घाटनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्यातील तालुक्यातील विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी सचिन जाधव यांची निवड सर्व संमतीने करण्यात आली. तसेच चेअरमंनपदी विजय कालरा, कॉर्डीनेशन कमिटी चेअरमन पदी अंजु सिंघल, महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी हेमंत सिंग, मराठवाडा विभाग प्रमुख पदी विजय काकडे, पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख पदी सुभाष बापु जाधव, कोषाध्यक्ष पदी अयुब कच्छी, ड्रायव्हर मदत कमिटी चेअरमनपदी राणी ताई पवार, मार्गदर्शक एस एन शर्मा, सुखा सिंग यांची निवड करण्यात आली.
तसेच जिल्हा स्तरावर श्री.महेश रघुवंशी (नंदुरबार जिल्हा),श्री.बाबा सहगल (बुलढाणा जिल्हा), श्री. माजीद लाला (नांदेड जिल्हा) ,श्री. मांगिलाल चौधरी, (धुळे जिल्हा) , श्री. मोहंमद सुलतान (उस्मानाबाद जिल्हा) यांची जिल्हाध्यक्ष म्हणुन निवड करण्यात आली तसेच नाशिक जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष श्री. महेंद्र सिंग राजपुत, उपाध्यक्ष सातपूर श्री. रवींद्र सिंग सोहल, सचिव रजनीश पारीख, सहसचिव श्री. रामभाऊ सूर्यवंशी, कोषाध्यक्ष श्री. दलजीत मेहता यांची निवड नाशिक जिल्हा साठी करण्यात आली.तसेच महाराष्ट्राची कार्यकारिणी बनविण्याचे काम अद्याप चालु आहे. लवकरच महाराष्ट्राची संपूर्ण कार्यकारिणी व महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांची, तालुक्याची कार्यकारिणी जाहीर करण्यात येईल.