इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – रशियाची लुना-२५ मोहीम चंद्रावर कोसळली आहे. रशियन स्पेस एजन्सी Roscosmos ने ही माहिती दिली आहे. विशेष म्हणजे, एक दिवस आधी लुना-२५ या अंतराळ यानात तांत्रिक बिघाड झाला होता. रशियाचे स्पेस कॉर्पोरेशन Roscosmos ने सांगितले की, अनियंत्रित कक्षेत फिरल्यानंतर रशियाचे Luna-25 यान चंद्रावर आदळले. Roscosmos ने एक दिवसापूर्वी सांगितले होते की लँडिंग करण्यापूर्वी कक्षा बदलताना एक असामान्य परिस्थिती उद्भवली, ज्यामुळे Luna-25 कक्षा योग्यरित्या बदलू शकले नाही. सोमवारच्या नियोजित टचडाउनच्या आधी शनिवारी 11:10 GMT वाजता वाहनाला प्री-लँडिंग ऑर्बिटमध्ये वाढवण्याचा प्रयत्न केला गेला तेव्हा ही परिस्थिती उद्भवली.
स्पेस एजन्सीने सांगितले की तज्ञ सध्या अचानक आलेल्या समस्येचा सामना करण्यास असमर्थ आहेत. त्यावर ते सातत्याने काम करत आहेत. याआधी, रशियन एजन्सीने सांगितले होते की लूना २१ ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. तत्पूर्वी, शनिवारी रशियन स्पेस एजन्सी Roscosmos ने स्पष्ट केले की, रशियाच्या Luna-25 यानात तांत्रिक बिघाड झाला होता. लँडिंगपूर्वी कक्षा बदलताना लुना-25 असामान्य परिस्थितीमुळे कक्षा योग्य प्रकारे बदलू शकली नाही.
Roscosmos ने अहवाल दिला होता की Luna-25 ने चंद्राच्या जमिनीवरील खड्ड्यांची छायाचित्रे पोस्ट केली होती. हे चंद्राच्या दक्षिण गोलार्धातील तिसरे सर्वात खोल विवर आहे, ज्याचा व्यास १९० किमी आहे आणि त्याची खोली ८ किमी आहे. एजन्सीचे म्हणणे आहे की लुना-25 वरून आतापर्यंत मिळालेल्या डेटावरून चंद्राच्या मातीतील रासायनिक घटकांबद्दल माहिती मिळाली आहे.
रशियन मीडियानुसार, लुना-25 लँडर हे शुक्रवारी, ११ ऑगस्ट रोजी पहाटे ४.४० वाजता रशियाच्या वोस्टोनी कॉस्मोड्रोम येथून प्रक्षेपित करण्यात आले. सोयुझ २.१बी रॉकेटमधून लुना-२५ चंद्रावर पाठवण्यात आले. त्याला लुना-ग्लोब मिशन असे नाव देण्यात आले आहे. रॉकेटची लांबी सुमारे ४६.३ मीटर होती तर त्याचा व्यास १०.३ मीटर होता. ३१३ टन वजनाचे रॉकेट ७ ते १० दिवस चंद्राभोवती फिरणार होते.
21 किंवा 22 ऑगस्ट रोजी लुना-25 चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचेल अशी अपेक्षा होती. त्याच वेळी, चांद्रयान-३ भारताने १४ जुलै रोजी प्रक्षेपित केले, जे २३ ऑगस्ट रोजी चंद्रावर उतरेल. लुना-25 आणि चांद्रयान-3 चा चंद्रावर उतरण्याची वेळ जवळपास सारखीच असणार होती. रशियाने याआधी १९७६ मध्ये लुना-२४ चंद्रावर उतरवले होते. जगात आतापर्यंत झालेल्या सर्व चंद्र मोहिमा चंद्राच्या विषुववृत्तापर्यंत पोहोचल्या आहेत.
Russian Roscosmos Luna-25 crashed on the lunar surface
Moon Space Chandrayaan-3