इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांचा मृत्यू किंवा निधन झाल्याचे वृत्त गेल्या दोन-तीन दिवसांपासून चर्चिले जात आहे. परंतु खरेच यांचे निधन (मृत्यू) झाले का? याविषयी उलट सुलट चर्चा सुरू असून तर्कवितर्क लावण्यात येत आहे, मात्र याबाबत कोणीही ठोसपणे सांगू शकत नाही. त्यातच आता डॉक्टरांनी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना तीन वर्षांचा जगण्याचा अवधी असल्याचा दावा रशियाच्या एका गुप्तचर अधिकाऱ्याने केला आहे.
कर्करोग हळूहळू वाढत आहे आणि त्यामुळे त्यांची दृष्टीही जात आहे. गेल्या काही दिवसांपासून मीडियामध्ये याबाबत उलटसुलट बातम्या येत आहेत की, राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. मात्र, रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी पुतीन आजारी असल्याचे ठामपणे नाकारले.
सर्गेई म्हणाले की अध्यक्ष पुतिन यांना या आजाराची कोणतीही लक्षणे नाहीत. एफएसबीच्या अधिकाऱ्याने यूकेमध्ये राहणारा माजी रशियन गुप्तहेर कार्पिकोव्हला संदेश पाठवून ही माहिती दिली होती. या मेसेजमध्ये असे लिहिले होते की, त्यांना डोकेदुखीचा त्रास होत आहे. याशिवाय त्यांची दृष्टी खूप वेगाने कमी होत आहे. याशिवाय त्याचे हातपाय देखील हालत नसल्याचेही एका अहवालात म्हटले आहे.
दरम्यान, या महिन्यात पुतिन यांच्या पोटातील द्रव काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागल्याच्या बातम्याही आल्या होत्या. कोणतीही अडचण न येता त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, रशियन सरकारने त्यांच्या प्रकृतीबाबत केलेले हे वाईट दावे फेटाळले आहेत. परराष्ट्र मंत्री म्हणाले, मला वाटत नाही की अशा त्यांचा एखाद्या आजारचा त्रास होत. पुतिन हे दोन दशकांपासून रशियात सत्तेवर आहेत.