इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – युक्रेन आणि रशियन सैन्य यांच्यातील युद्धाला दोन महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. रशियन सैनिकांकडून युक्रेनच्या भूमीवर जे अत्याचार केले जात आहेत ते कोणापासून लपलेले नाहीत. त्यातच बुका हत्याकांडाने संपूर्ण जगाला हादरवले आहे.
युक्रेनमधील खेरसन शहरातील एका किशोरवयीन मुलीने रशियन सैनिकावर बलात्काराचा आरोप केला आहे. सुमारे ६ महिन्यांच्या गरोदर मुलीने सांगितले की, एक रशियन सैनिक त्या वेळी दारूच्या नशेत होता. तो माझ्या जवळ आला आणि ओरडला की, एकतर तू माझ्यासोबत झोप, नाहीतर मी आणखी 20 पुरूषांना सोबत घेऊन तुझ्याकडे येईन.
कथित बलात्काराच्या वेळी ती किशोरी सहा महिन्यांची गर्भवती होती. तिने सांगितले की, मद्यधुंद रशियन सैनिकाने माझा गळा दाबला आणि प्रतिकार केल्यास ठार मारण्याची धमकी दिली. रशियन बॉम्ब हल्ल्यापासून वाचण्यासाठी या मुलीने आणि तिच्या कुटुंबीयांनी त्यांच्या घराच्या तळघरात आश्रय घेतला होता.
दरम्यान, संध्याकाळी जेव्हा मुलीची आई व कुटुंबातील अन्य सदस्य बाहेर जेवायला घेऊन गेले, तेव्हा त्यांना एका मद्यधुंद रशियन सैनिकाने पाहिले आणि तो तळघरात आला तिथे 12 आणि 14 वर्षांच्या दोन मुली होत्या आणि ही पिडीत मुलगी 16 वर्षांची आहे. त्याने या मुलीला जवळ बोलावले कपडे काढण्यास सांगितले. तिने नकार दिल्यावर बलात्काराला विरोध केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. नशेत नसलेल्या दुसर्या रशियन सैनिकाने हल्लेखोराला थांबण्यास सांगितले, परंतु सर्व व्यर्थ ठरले.