इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्याने अतिशय भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच युक्रेनमध्ये शेकडो भारतीय विद्यार्थी अडकून पडले आहेत. या विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. युक्रेनमधील महत्त्वाच्या शहरांपैकी एक असलेल्या खिरकीवमध्ये अनेक भारतीय विद्यार्थी आहेत. रशियाने खिरकीववर ताबा मिळविण्यासाठी आक्रमकपणे हल्ला चढविला आहे. याची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी फोनद्वारे चर्चा केली. भारतीय विद्यार्थ्यांना खिरकीवमधून सुरक्षितपणे बाहेर पडण्यासाठी सहकार्य करावे, अशी विनंती केली. त्याची दखल पुतिन यांनी घेतली. म्हणून खिरकीवमध्ये तब्बल ६ तास युद्धबंदी करण्याचा निर्णय पुतिन यांनी घेतला. तसेच, आदेश रशियन सैन्याला देण्यात आले. त्यानुसार सहा तासांच्या अवधीत रशियाने कुठलाही हल्ला खिरकीव शहरावर केला नाही. तसेच, रशियन सैन्याने भारतीयांना शहराबाहेर पडण्यासाठी विशेष कॉरिडॉर तयार केला. त्याद्वारे भारतीय विद्यार्थी खिरकीव शहराबाहेर पडत असल्याचे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले आहे.
https://twitter.com/nitingokhale/status/1499006163509080076?s=20&t=e-Q8e2_yNVaIr9Kgdje97A