इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – रशिया आणि युक्रेन यांच्यात सध्या सुरू असलेल्या युद्धामुळे अनेक प्रसंगांना तोंड द्यावे लागत आहे. केवळ युक्रेनच नाही तर रशियातील नागरिकही विविध समस्यांनी हैराण झाले आहेत. त्यातच आता रशियामध्ये साखर खरेदीसाठी मोठी झुंबड उडाल्याचे पहायला मिळत आहे. एका सुपर मार्केटमध्ये तर साखर खरेदीसाठी चक्क धक्काबुक्कीही झाल्याचे दिसून येत आहे. यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. साखरेचे दरही खुप महाग झाले आहेत. सुपर मार्केट किंवा शॉपमध्ये साखरेची साठवणुकीवर मर्यादा लावण्यात आली आहे. मागणी आणि पुरवठ्यातील संतुलन बिघडल्यानेही दरावर मोठा परिणाम झाला आहे. बघा हा व्हायरल व्हिडिओ
https://twitter.com/buch10_04/status/1505068461998882821?s=20&t=0vg0teOvWaLRlupT16tLOw