नवी दिल्ली – कोरोनावरील स्पुटनिक-५ या रशिनय लसीला भारतात आपत्कालिन वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे. ही लस हैदराबाद येथील रेड्डीज लॅबोरेटरी कडून उत्पादित केली जाणार आहे. अशा प्रकारची परवानगी मिळालेली ही तिसरी लस ठरली आहे. यापूर्वी सिरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या लसीला मंजुरी मिळाली आहे.
भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने केंद्र सरकारने आता तिसऱ्या लसीला देशात वापरासाठी मंजुरी दिली आहे. यामुळे लसीकरणाला मोठा वेग येणार आहे. काही महिन्यांपूर्वीच स्पुटनिक लसीची दुसर्या आणि तिसर्या टप्प्यातील चाचणी भारतात घेण्यात आली. कसौली येथील सेंट्रल फार्मास्युटिकल लॅबोरेटरीकडून आवश्यक परवानगी मिळाल्यानंतर या लसीच्या चाचण्या घेण्यात आल्या. फार्मा कंपनीने सर्व औपचारिकता पूर्ण केल्या आहेत आणि देशातील १२ ठिकाणी चाचण्या करण्यात आल्या.
स्पुटनिक लसीचे दोन डोस घ्यावे लागणार आहेत. पहिला डोस आणि दुसरा डोस यांच्यातील अंतर २१ दिवसांचे असणार आहे. ही लस अधिक प्रभावी असल्याचा दावा करण्यात आला आहे. या लसीमुळे भारतात आता एकूण ३ लस उपलब्ध झाल्या आहेत. कोरोनाच्या लढाईत या तिन्ही लस महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.
https://twitter.com/PTI_News/status/1381548603123015686