इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – टेस्ला आणि स्पेसएक्सचे संस्थापक एलॉन मस्क यांनी युक्रेनमध्ये त्यांचे व्यावसायिक इंटरनेट नेटवर्क स्टारलिंक सक्रिय केले आहे. स्टारलिंक सेवा आता युक्रेनमध्ये सक्रिय झाले आहे, अशी माहिती मस्कने ट्विटरवर दिली आहे. मस्कच्या स्पेसएक्सच्या कक्षेत हजारो स्टारलिंक उपग्रह आहेत, जे कंपनीला फायबर-ऑप्टिक केबल्सच्या गरजेशिवाय पृथ्वीभोवती ब्रॉडबँड सेवा पुरवतात. हे स्टारलिंक मस्कने सक्रिय केले असल्यामुळे रशियन हल्ल्यांमुळे युक्रेनच्या इंटरनेट पायाभूत सुविधांचे नुकसान झाले तरीदेखील, उपग्रहांच्या मदतीने ऑनलाइन व्यवहार ते सुरू ठेवू शकतील असे अहवालात म्हटले आहे.
युक्रेनचे पहिले उपपंतप्रधान आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन मंत्री मायखाइलो फेडोरोव्ह यांनी मस्कला विनंती करण्यात आल्याने मस्क यांनी हे पाऊल उचलले आहे. शनिवारी युक्रेनमध्ये रशियन लष्करी हल्ले आणि सायबर हल्ले झाले. हे पाहता युक्रेनने मस्ककडे मदतीची याचना केली होती. मस्कचा स्टारलिंक प्रकल्प पृथ्वीच्या कक्षेत उपग्रहांचे ग्रिड स्थापन करण्याचा एक महत्त्वाकांक्षी प्रयत्न आहे. त्यामुळे जगभरात इंटरनेटचा वापर करता येईल, असे नुकतेच एका अहवालातून सांगण्यात आले आहे. तसेच स्पेस एक्सने आतापर्यंत १७०० पेक्षा जास्त स्टारलिंक उपग्रह कक्षेत ठेवले आहेत आणि एकूण ४० हजारांहून अधिक उपग्रह प्रक्षेपित करण्याची कंपनीची योजना आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये वापरकर्त्यांना चुकीची कोणतीही माहिती मिळू नाही यासाठी ट्विटरने जाहिराती आणि शिफारसींवर बंदी घातली आहे. दुसरीकडे रशियाकडून ट्विटरवरच सध्या बंदी घालण्यात आली आहे. रशियामध्ये ट्विटरवर बंदी घातली आहे.