नवी दिल्ली – रशियातील एका विद्यापीठात झालेल्या गोळीबारात ८ लोकांचा मृत्यू झाला आहे. गोळीबारानंतर विद्यापीठात एकच गोंधळ उडाला. या घटनेनंतर अनेक विद्यार्थ्यी इमारतीतून उड्या मारून पळू लागले. सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला असून त्यामध्ये विद्यार्थी जिवाच्या भीतीने पळत असल्याचे दिसत आहे.
रशियातील पर्म शहरातील एका विद्यापीठात सोमवारी सकाळी झालेल्या गोळीबारात कमीत कमी आठ लोकांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत, अशी माहिती रशियाची तपास समितीने दिली. पर्म भागातील आरोग्य विभागाच्या माहितीनुसार या घटनेत १४ जण जखमी झाले आहेत. विद्यापीठात गोळीबार झाल्याची घटना समजताच जीव वाचविण्यासाठी विद्यार्थ्यांनी इमारतीवरून उड्या मारल्या. विद्यापीठाच्या माहितीनुसार, अज्ञात बंदुकधा-याने ही घटना घडवून आणली. विद्यापीठाच्या कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी स्वतःला एक वर्गात सुरक्षितरित्या बंद करून घेतले. तर जे लोक पळून जाऊ शकतात त्यांना त्वरित परिसर सोडण्याच्या सूचना करण्यात आल्या. संशयित बंदुकधार्याला ताब्यात घेण्यात आले असून, तपास समितीने या घटनेची चौकशी सुरू केली आहे, अशी माहिती रशियाच्या गृहमंत्रालयाने दिली आहे.