मंगळवार, जून 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

ग्रामीण भागातील निवासी अतिक्रमणे होणार नियमित; असा मिळणार लाभ

by India Darpan
मे 8, 2021 | 10:40 am
in स्थानिक बातम्या
0
dadaji bhuse 2

प्रतिनिधी, मालेगाव
सर्वांसाठी घरे या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना अतिक्रमित जागा निवासासाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार राज्यातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याबाबतचे धोरण निश्चित करण्यात आले असून या धोरणातंर्गत शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचनेनुसार या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी होऊन प्रलंबित प्रकरणे तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले.
शासकीय विश्रामगृह येथे मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली शक्ती प्रदत्त समितीची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती, याप्रसंगी मंत्री श्री.भुसे बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम उपविभागीय अधिकारी डॉ. विजयानंद शर्मा गट विकास अधिकारी जितेंद्र देवरे तहसीलदार चंद्रजीत राजपूत, रामा मिस्तरी आदी उपस्थित होते.
शासकीय जमिनीवरील निवासी प्रयोजनासाठी केलेली अतिक्रमणे नियमानुकूल करणे हा जुना विषय असल्याचे सांगत मंत्री श्री.भुसे म्हणाले शक्ती प्रदत्त समितीच्या निर्णयानुसार नियमानुकूल होणाऱ्या प्रकरणांची संख्या तुलनेने कमी आहे. प्रलंबीत प्रकरणे तातडीने मार्गी लागल्यास सर्वांसाठी घरे २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी होऊन पात्र लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या कामातून शासनास मोठ्या प्रमाणात महसूल मिळणार असून स्थानिक ग्रामपंचायतींना देखील उत्पन्नाचे चांगले स्रोत निर्माण होणार असल्याची माहिती मंत्री श्री.भुसे यांनी यावेळी दिली.
पुढे बोलताना मंत्री भुसे म्हणाले, राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेतर्गत घरकुल पात्र परंतु जागेअभावी घरकुलाच्या लाभापासून वंचित असलेल्या लाभार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे जागेअभावी घरकुलाच्या लाभापासून वंचित असलेल्या लाभार्थ्यांसाठी ५० हजारापर्यंतचे अर्थसहाय पंडीत दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय योजना असून वरील निर्देशाची तातडीने अंमलबजावणी झाल्यास घरकुलाच्या लाभापासून वंचित असलेल्या लाभार्थ्यांची संख्याही कमी होण्यास नक्कीच मदत होईल, असा विश्वासही मंत्री श्री. भुसे यांनी यावेळी व्यक्त केला.
वीज वितरण कंपनीच्या कामकाजाचा आढावा
शहरात वीज पुरवठा करणाऱ्या वीज वितरण कंपनी मार्फत वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त होत आहेत. वीज ग्राहकही आंदोलनाच्या पवित्र्यात असून याची गंभीर दखल घेत राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली.
शहरासह तालुक्यात सुरळीत वीज पुरवठा होईल याबाबत दक्ष राहुन कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले, तर कंपनीकडे असलेले मनुष्यबळ व वीज वितरणाच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या उपाययोजनांचा अहवाल सादर करण्याच्या सूचनाही मंत्री श्री.भुसे यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

तामिळनाडूचे मुख्यमंत्री होताच स्टॅलिन यांनी केल्या या मोठ्या घोषणा

Next Post

येवला – लसीकरणासाठी मोठी गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा (बघा व्हिडिओ )

India Darpan

Next Post
20210508 163615

येवला - लसीकरणासाठी मोठी गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा (बघा व्हिडिओ )

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना नव्या संधीतून लाभ मिळतील, जाणून घ्या, मंगळवार, २४ जूनचे राशिभविष्य

जून 23, 2025
Untitled 16

ईडीची मोठी कारवाई…कोल्हापूर, सुरत, अहमदनगर आणि पुणे येथे छापे….

जून 23, 2025
Screenshot 20250623 191130 WhatsApp

धक्कादायक! कळवणला भररस्त्यात गायींच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू, बघा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ

जून 23, 2025
Untitled 58

अवघ्या ३६ तासात सीरियातील अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ला…

जून 23, 2025
crime1

मोठी कारवाई….चोरीच्या हेतूने दबा धरून बसलेल्या बारा जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या

जून 23, 2025
mpsc

एमपीएससी परीक्षार्थ्यांसाठी ही प्रक्रिया बंधनकारक….

जून 23, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011