पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात महिला आघाडीमध्ये धुसफूस सुरुच आहे. रुपाली चाकणकर यांना काही दिवसापूर्वी पुन्हा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आल्यामुळे रुपाली पाटील ठोंबरे यांनी एक व्यक्ती एक पद नियमानुसार रुपाली चाकणकर यांच्याकडील महिला प्रदेशाध्यक्षपद काढून घ्या अशी मागणी केली होती. त्यानंतर रुपाली चाकणकर यांनी ठोंबरे यांना मी बाहेरची असल्याचे म्हटले होते. त्यानंतर हा वाद अजित पवार पर्यंतही गेलो होता. पण, आता पुन्हा रुपाली पाटील ठोंबरे यांनी एक फेसबुक पोस्ट टाकून खळबळ निर्माण केली असून या पोस्टमध्ये त्यांनी अप्रत्यक्षपणे चाकणकर यांच्यावर निशाणा साधला आहे.
या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की,
बाई काय हा प्रकार…
किती वेळा तेच ते..
“रात्रीस खेळ चाले” ची एवढी बजबजपुरी झाल्यानंतर झाल्यानंतर मालिका बंद होईल असं वाटलं होतं…
पण छेss निर्मात्याची मागणी तसा नायिकेचा पुरवठा..!!
तोच तो डर्टी पिक्चर किती वेळा बघायचा…?
दयाकुछतोगडबड है
दालमेंकुछ कालानही पुरीदालही कालीहै भाई.
कारण ‘महाराष्ट्र आहे, गुजरात नाही’ हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावं!