मुंबई – नगरचे भाजप खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी खासगी विमानातून थेट १० हजार रेमडेसिविर इंजेक्शन आणले आहेत. त्याचा व्हिडिओ त्यांनी प्रसारित केला आहे. मात्र, डॉ. विखे यांनी नक्की रेमडेसिविर इंजेक्शनच आणले आहेत का, असा प्रश्नच राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी विचारला आहे. विखे यांनी आणलेली औषधे संशयास्पद असल्याचे चाकणकर यांनी म्हटले आहे. जर, डॉ. विखे यांनी रेमडेसिविर आणले आहेत तर नगरमध्ये सर्वसामान्यांना वणवण का भटकावे लागत आहे, असा सवालही चाकणकर यांनी विचारला आहे. डॉ. विखे यांनी हे इंजेक्शन नक्की कुठे वाटले याचा तपशील जाहिर करावा किंवा हे इंजेक्शन कुठे मिळणार आहे, ते सांगावे, असे आव्हानही चाकणकर यांनी दिले आहे.
https://twitter.com/ChakankarSpeaks/status/1386212326563409922