पुणे – विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते व भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी पुणे येथे एका कार्यक्रमात गरिबांकडे बघण्यासाठी राष्ट्रवादीला वेळ नाही, राष्ट्रवादी हा रंगलेल्या गालांचा मुका घेणारा पक्ष आहे असे म्हटले होते. त्याला प्रत्युत्तर देत राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आक्रमक पवित्रा घेत एक ट्विट केले असून त्यात म्हटले आहे प्रविण दरेकर, महिलांची माफी मागा अन्यथा आम्हीही महिलांचा अपमान करणाऱ्यांचे थोबाड आणि गाल रंगवू शकतो याची जाणीव ठेवा. या ट्विट मध्ये त्यांनी एक व्हिडिओही शेअर केला असून त्यात सविस्तर माहिती दिली आहे….
https://twitter.com/ChakankarSpeaks/status/1437443694051741697?s=20