मुंबई – कोणताही सर्वसामान्य नागरिक म्हणजेच बँक ग्राहक आपल्या सोयीसाठी एखाद्या बँकेत खाते उघडतो, तेव्हा तो व्याज दर, इतर सुविधांसाठी शुल्क यावर विशेष लक्ष देतो. परंतु या काळात तो पैसे काढण्याची मर्यादा तपासण्यास विसरतो. देशातील काही महत्त्वाच्या सरकारी आणि खासगी बँकांमध्ये रोख रक्कम काढण्याची मर्यादा काय आहे ? त्यांच्या संदर्भात काय नियम आहेत ते जाणून घेऊ या…
स्टेट बँक ऑफ इंडिया
एसबीआय ग्राहक नॉन होम ब्राँच म्हणजे अन्य शाखांमधून 25,000 रुपये रोख काढू शकतात. तर आपल्या बँक शाखेच्या बचत खात्यातून चेकद्वारेच एक लाख रुपये काढता येतात. तर थर्ड पार्टीला (अन्य व्यक्तीला) आपल्या अनुमतीने 50,000 रुपये रोख काढण्याची परवानगी आहे.
पंजाब नॅशनल बँक
पीएनबी आपल्या ग्राहकांना तीन प्रकारे रोख रक्कम काढण्याची परवानगी देते. त्यात प्लॅटिनम, क्लासिक आणि गोल्डचा समावेश आहे. बँकेच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, प्लॅटिनम कार्डधारक एका दिवसात 50,000 रुपये रोख काढू शकतात. तर एका वेळी 20 हजार रुपये रोख काढण्याची मर्यादा असेल. तर ई-कॉमर्स हेतूंसाठी मर्यादा 1.25 लाख रुपये असेल. पीएनबी क्लासिक कार्डधारक 25,000 रुपये काढू शकतील. ई-कॉमर्ससाठी 60,000 रुपयांची मर्यादा आहे. त्याच वेळी, गोल्ड डेबिट कार्ड धारकाची रोख मर्यादा 50,000 रुपये आहे. ई-कॉमर्सची मर्यादा 1.25 लाख रुपये आहे.
आयसीआयसीआय बँक
1 ऑगस्ट 2021 पासून, होम ब्राँच म्हणजे आपल्या शाखेतून खात्यातून दरमहा फक्त 1 लाख पैसे काढण्याची परवानगी देते. तर खाते नसलेल्या शाखांमधून दररोज 25,000 रुपये काढता येतात. त्याचबरोबर थर्ड पार्टीसाठीही प्रतिदिन 25,000 रुपयांची मर्यादा आहे.