रुद्राक्ष फॅशन म्हणून वापरतात की त्यामागे काही कारण आहे
रुद्राक्षाला पुराण काळापासूनच धार्मिक अधिष्ठान आहे. सर्वच ऋषी-मुनी रुद्राक्ष धारण करत. रुद्र-अक्ष अशा दोन शब्दांनी रुद्राक्ष शब्द बनतो. रुद्र म्हणजे भगवान शिव व अक्ष म्हणजे नयन. रुद्राक्ष यास भगवान शिवाचा अंश मानले गेले आहे. रुद्राक्ष म्हणजे भगवान शिवाचे आनंदाश्रू, अशीही धार्मिक मान्यता आहे. रुद्राक्षाची वैशिष्ट्ये, तो का व कसा वापरतात हे आज आपण जाणून घेऊ.

व्हॉटसअॅप – 9373913484
रुद्राक्ष मुख
रुद्राक्ष वर असलेल्या धारा यांना रुद्राक्षाचे मुख असे म्हणतात. 1 मुखी पासून 21 मुखी पर्यंत रुद्राक्ष मिळतात. त्यातल्या नवमुखी रुद्राक्षापासून पुढचे अतिशय दुर्मिळ व महाग असतात.
रुद्राक्षाचे रंग
पांढरा, लाल, तपकिरी व काळसर असे रुद्राक्षाचे चार रंग आढळतात.
आकार
छोटा, मध्यम आणि मोठा अशा तीन आकारात रुद्राक्ष आढळतात.
रुद्राक्षची विविध नावे
एकच 21 मुखी रुद्राक्ष प्रमाणेच अन्य आकारातील व त्यावरील चिन्हांवरून रुद्राक्षांना शिव रुद्राक्ष, ओम रुद्राक्ष, गणेश रुद्राक्ष, गौरीशंकर रुद्राक्ष, त्रिशुल रुद्राक्ष, नंदी रुद्राक्ष, शिव परिवार रुद्राक्ष अशा विविध नावांनी ओळखले जाते.
रुद्राक्षांचे देश
मुख्यतः इंडोनेशिया आणि नेपाळ या देशांमध्ये रुद्राक्षांची सर्वाधिक झाडे आहेत. त्यातील नेपाळमधील रुद्राक्ष त्यांच्या एकसारखे आकार, त्यावरील धारांची स्पष्टता (CLEAN N CLEARATY), स्वच्छ दाणेदारपणा यामुळे तुलनेने महाग असतात.
धारण करण्याची पद्धत
रुद्राक्ष हे पेंडंट, ब्रेसलेट, अंगठी या तीनही स्वरूपात वापरता येतात. सोने, चांदी, तांबे, पंचधातू, अष्टधातू यांचे रुद्राक्ष भोवती कवच बनवून त्याच्या विविध वस्तू बनवतात.
कोणता रुद्राक्ष वापरावा
रुद्राक्ष वापरण्याबाबत विविध प्रकारे सल्ला दिला जातो. कुंडली, चंद्रराशी, हस्त रेषा, आतापर्यंत आलेले अनुभव होत.
रुद्राक्ष सर्टिफिकेट
रत्नांप्रमाणेच रुद्राक्ष सोबत देखील त्याच्या माहिती व सत्यतेबाबतचे सर्टिफिकेट उपलब्ध असते. आपण कोणता रुद्राक्ष वापरावा त्याबाबतचे नियम व माहिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी आमच्या व्हॉट्सअपवर रुद्राक्ष शब्द पाठवून अपॉइंटमेंट घ्यावी. शुभम भवतु