मंगळवार, जून 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

राज्यभरातील खाजगी प्रवासी बसेसवर जोरदार कारवाई; तब्बल १.८३ कोटींचा दंड वसूल

by India Darpan
जुलै 14, 2023 | 5:43 pm
in राज्य
0
RTO Traffic

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यभरातील सर्व परिवहन कार्यालयांतील ‘वायुवेग’ पथकांमार्फत 14 हजार 161 खाजगी बसेसची तपासणी करण्यात आली आहे. यापैकी 4 हजार 277 खाजगी बसेस नियम मोडत असल्याचे निदर्शनास आल्याने या बसेसना तपासणी प्रतिवेदने जारी करुन प्रकरणे नोंदवित कारवाई करण्यात आली आहे. विविध कार्यालयांमार्फत 1 कोटी 83 लक्ष तडजोड शुल्काचा दंड वसूल करण्यात आला आहे.

तपासणी दरम्यान रिफ्लेक्टर, इंडिकेटर, टेल लाईट, वायपर इत्यादी गुन्ह्यांसाठी सर्वात जास्त 1702 बसेस वर कारवाई करण्यात आली. विनापरवाना अथवा परवान्याच्या अटींचा भंग करुन वाहन चालविणाऱ्या 890 बसेसवर; योग्यता प्रमाणपत्र वैध नसलेली 570 खाजगी बसेसवर, तर 514 बसेसमध्ये अग्निशमन यंत्रणा कार्यरत नसल्याचे आढळून आले असून त्यावर कारवाई करण्यात आली.

शासनाने विहित केलेल्या भाडेदरापेक्षा जास्त भाडे आकारणाऱ्या खाजगी कंत्राटी प्रवासी बसेसची व इतर गुन्ह्यांबाबत तपासणी करण्यासाठी राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांनी 16 मे ते 30 जून 2023 दरम्यान विशेष मोहीम राबविली. सदर तपासणी माहिमेमध्ये बसेसची तपासणी करताना विनापरवाना अथवा परवान्याच्या अटींचा भंग करुन वाहन चालविणे, टप्पा वाहतूक, प्रवासी बसमधून अवैधरित्या मालवाहतूक, योग्यता प्रमाणपत्र वैध नसणे, रिफ्लेक्टर, इंडिकेटर, टेल लाईट, वायपर इत्यादींमध्ये बेकायदेशीर केलेले फेरबदल, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक, मोटार वाहन कर भरल्याची खात्री करणे, जादा भाडे आकरणे, अग्निशमन यंत्रणा कार्यरत असणे, आपत्कालीन परिस्थितीत निर्गमन दर आणि इतर दरवाजे कार्यरत स्थितीत आहेत काय आदी बाबींची राज्यभर व्यापक तपासणी करण्यात आली. त्यानंतर उक्त नमूद विविध गुन्ह्यांमध्ये दोषी आढळलेल्या बसेसवर कारवाई करण्यात आली.

विविध गुन्ह्यांसाठी कारवाई
मोटार वाहन कर न भरणाऱ्या 485 बसेस, आपत्कालीन दरवाजा कार्यरत स्थितीत नसणाऱ्या 293 बसेस, अवैधरित्या व्यवसायिक पद्धतीने माल वाहतूक करणाऱ्या 227 बसेस, आसन क्षमतेपेक्षा जादा प्रवासी वाहतुक करणाऱ्या 147 बसेस, वेग नियंत्रक बसविणे व ते कार्यरत असणे आवश्यक असतांना वेग नियंत्रक नसणारी 72 बसेस, जादा भाडे आकारणी करणाऱ्या 40 बसेस व इतर गुन्ह्यांमध्येसुद्धा विशेष तपासणी मोहिमेच्या कालावधीत खाजगी बसेसवर परिवहन विभागामार्फत कारवाई करण्यात आली आहे. प्रवाशांचा प्रवास सुरक्षित व्हावा या दृष्टीकोनातून सदर व्यापक मोहीम राबविण्यात आली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

खाते वाटप होताच अजित पवारांनी घेतली या विभागाची बैठक

Next Post

खाते बदलात दादा भुसेंना फायदा की तोटा? आता पालकमंत्रीपदाचे काय होणार?

India Darpan

Next Post
Dada Bhuse

खाते बदलात दादा भुसेंना फायदा की तोटा? आता पालकमंत्रीपदाचे काय होणार?

ताज्या बातम्या

Rahul Gandhi

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मतदारसंघातील मतदानावरुन राहुल गांधी यांचा गंभीर आरोप….

जून 24, 2025
jail11

लग्नाचे आमिष दाखवून होंडा सिटी कार, बुलेट व २४ लाखांची रोकड उकळली, बापलेकास अटक…अशी केली फसवणूक

जून 24, 2025
crime1

लग्नाचे आमिष दाखवून मुंबईच्या डॉक्टर महिलेस लाखोंचा गंडा…सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जून 24, 2025
goldBYQF e1743933825463

मुंबईत तस्करीचे सोने वितळवणारा अवैध गोल्ड मेल्टिंग कारखान्याचा पर्दाफाश…सात जण ताब्यात, ९ कोटीचे सोने जप्त

जून 24, 2025
Screenshot 20250623 224646 Collage Maker GridArt

धक्कादायक…मुलीला नीट परिक्षेत कमी मार्क पडल्याच्या रागातून मुख्याध्यापक बापाने केलेल्या बेदम मारहाणीत मुलीचा मृत्यू

जून 24, 2025
Corruption Bribe Lach ACB

पाच हजाराची लाच घेतांना ग्रामसेवकसह रोजगार सेवक एसीबीच्या जाळ्यात

जून 24, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011