नाशिक – प्रादेशिक परिवहन विभागातील गैरव्यवहाराचे आरोपावरुन चर्चेत आलेले निलंबित वाहन निरीक्षक गजेंद्र पाटील आज पोलिस आयुक्तांपुढे हजर झाले. उपायुक्त संजय बारकुंड हे त्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने जबाब घेत आहे. .सोमवारी दुपारी पाटील यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना मंगळवारी चौकशीसाठी पून्हा बोलावले होते. त्यामुळे ते आज हजर झाले आहे. पाटील यांच्याबरोबर परिवहन विभागाचे सहसचिव प्रकाश साबळे यांचीही चौकशी सुरु आहे.
प्रादेशिक परिवहन विभागातील कथित गैरव्यवहार प्रकरणात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने अगोदरच आरोप झालेल्या दहा जणांचे जबाब नोंदविले आहेत. त्यात परिवहन आयुक्तांचाही समावेश आहे. पदोन्नती आणि बदल्यांमध्ये कोट्यवधी भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप निलंबित मोटर वाहन निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी केला आहे.
या प्रकरणी पोलिसांकडून चौकशीला बगल देण्याचा प्रयत्न होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवून या प्रकरणाची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभागाद्वारे (सीबीआय) चौकशी करावी, अशी याचिका निलंबित गजेंद्र पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यामुळे आज ते चौकशीत काय बोललात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.