नाशिक – दसरा सणानिमित्त नवीन वाहनांची खरेदी मोठ्या प्रमाणावर होत असते. आजच्या दिवशी नवीन वाहनांना नोंदणी होणे, नवीन क्रमांकासह ग्राहकास वाहनाचा ताबा मिळणे व शासकीय महसूल जमा होणे यासाठी आज सार्वजनिक सुटीच्या दिवशीही प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू रहाणार असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदिप शिंदे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.शासकीय प्रसद्धी पत्रकात नमूद केल्यानुसार, नागरिकांनी नवीन वाहन खरेदी केले असल्यास त्यांची नोंदणीची कार्यवाही आज करून घ्यावी, असे आवहनही प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदिप शिंदे यांनी केले आहे.