नाशिक – नंदुरबार परिवहन कार्यालयातील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नानासाहेब बच्छाव यांची भ्रष्टाचाराची व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे. त्या क्लिप मध्ये नानासाहेब बच्छाव हे १० लाख रुपये स्वीकारत दिसत आहेत. या प्रकरणाची ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेस कडून १९ सप्टेंबर २०२० रोजी परिवहन मंत्री अनिल परब यांना मेलद्वारे तक्रार करण्यात आली. तसेच लाचलुपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधिक्षक सुनिल कडासने यांच्याकडे २८ सप्टेंबर २०२० रोजी तक्रार करण्यात आली. या व्हायरल व्हिडिओ क्लिपची चौकशी करून दोषी अधिकारी यांचे वर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. पण आजपर्यंत कोणतीही कारवाई होतांना दिसली नाही. व परत पुन्हा एकदा ती व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे. तरी त्या क्लिपची सत्यता पडताळून दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी.
ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेस परिवहन विभागास नम्र विनंती करत आहेत की नंदुरबार येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नानासाहेब बच्छाव यांची भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषी अधिकाऱ्याला निलंबित करण्यात यावे अन्यथा नाईलाजास्तव ऑल इंडिया मोटार ट्रान्संपोर्ट काँग्रेस कडून मोठे आंदोलन छेडण्यात येईल.
त्यावेळी ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे नाशिक धुळे जिल्हा अध्यक्ष सचिन जाधव, अंजु सिंगल, अनिल कौशिक, अवतार सिंग बिर्दी, अंजय सिंग,किरण भालेकर, वेध प्रकाश झांझरिया, राजेश पवार, विनायक वाघ, परवेज पठाण, ज्ञानेश्र्वर वरपे, विनोद शर्मा, मारुती काकड,देव अग्रवाल, प्रविण अग्रवाल,अमन चौधरी , दिलीपसिंह बेनिवाल, ईश्वर सोनावणे, उत्तम कातकडे, संजय तोडी, देवेंद्र विग, हरिभाऊ होळकर, निसार शेख, एच जी टी तिवारी, रतन अग्रवाल,सोनू शर्मा , अतुल रावल, नारायण गांजवे हे पदाधिकारी उपस्थित होते