गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

RTO कथित गैरव्यवहार प्रकरणी पोलीस महासंचालकांकडे दिलेला अहवाल ५३०० पानांचा

by India Darpan
जून 23, 2021 | 9:21 am
in स्थानिक बातम्या
0
rto

नाशिक – प्रादेशिक परिवहन विभागातील कथित गैरव्यवहार प्रकरणी नाशिक पोलीसांनी सादर केलेला अहवाल हा ५३०० पानाचा असून त्यात ८६ जणांचे जबाब नोंदवले आहे. त्यात आरटीओशी संबंधित ७९ अधिकारी आणि कर्मचारी, एक पोलीस अधिकारी आणि ६ इतर लोकांचा समावेश आहे. दरम्यान या अहवालाबाबत निलंबित आरटीओ निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी प्रतिक्रिया देतांना सांगितले की, मला धक्का बसला आहे. मी पोलीसांना पुरावे दिल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
मंगळवारी या कथित घोटाळयाचा चौकशी अहवाल पूर्ण झाल्यानंतर राज्यभर या अहवालाबाबत चर्चा सुरु झाली आहे. निलंबित मोटर वाहन निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी १५ मे रोजी पंचवटी पोलिस स्थानकात तक्रार केली होती. त्यानंतर ४५ दिवसाच्या चौकशीनंतर हा अहवाल तयार करण्यात आला आहे. या अहवालात नाशिक आयुक्तालय हद्दीत कोणताही गुन्हा झाल्याचे चौकशीत निष्पन्न होत नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. अर्जातील इतर तथ्यांविषयी मुद्दसुद्द अहवाल पुढील कार्यवाहीसाठी पोलीस महासंचालकाकडे पाठवण्यात आल्याची माहिती पोलीसांनी दिली. त्यामुळे आता महासंचालकांकडे दिलेल्या अहवालात नेमके काय मुद्दे आहे याबाबत चर्चा सुरु झाली आहे.
या तक्रारीमुळे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणी वाढल्या होत्या. पण, या चौकशीत नाशिकमध्ये गुन्हा झाल्याचे चौकशीत निष्पन्न होत नसल्यामुळे तूर्त तरी त्यातून परबसह आरटीओ अधिका-यांना दिलासा मिळाला आहे. पाटील यांनी केलेल्या तक्रारीत परिवहन विभागातील कार्यपध्दतीमधील अनियमितता, आर्थिक गैरव्यवहार, विभागा अंतर्गत वाद, बदली प्रकरणातील अनागोंदी कारभार, परिवहन विभागातील वादग्रस्त कार्यपध्दती याबाबत तक्रार केली होती. या तक्रारींतर आयुक्त दीपक पांण्डेय यांनी नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाचे उपायुक्त संजय बारकुंड यांच्याकडे अर्जाच्या चौकशीचे काम सोपवले होते. त्यानंतर अनेक अधिका-यांचे जबाब नोंदविले आहेत. त्यात परिवहन आयुक्तांचाही समावेश होता.
मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल
या प्रकरणी पोलिसांकडून चौकशीला बगल देण्याचा प्रयत्न होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवून या प्रकरणाची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभागाद्वारे (सीबीआय) चौकशी करावी, अशी याचिका निलंबित गजेंद्र पाटील यांनी अगोदरच मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. पोलिस आणि आरटीओकडून परस्पर सहकार्याने हे प्रकरण दडपण्याची शक्यता असल्याचे याचिकेत म्हटले आहे. तक्रार दिल्यानंतरही पोलिसांनी चौकशी करण्यास टाळाटाळ केली. याचिका दाखल होण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर काही अधिका-याची चौकशी सुरू करण्यात आल्याचेही याचिकेत म्हटले आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नव्या प्राप्तिकर पोर्टलवरील समस्यांबाबत करदाते हैराण, अर्थ मंत्रालयाच्या बैठकीत ही झाली चर्चा

Next Post

नाशिक-सुरत महामार्गासाठी जमिनी हस्तांतरणाला सुरुवात, खा. गोडसे यांनी दिली ही माहिती

India Darpan

Next Post
hemant godse e1598937277337

नाशिक-सुरत महामार्गासाठी जमिनी हस्तांतरणाला सुरुवात, खा. गोडसे यांनी दिली ही माहिती

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011