नाशिक – प्रादेशीक परिवहन विभागाच्या कथित आर्थिक गैरप्रकाराबाबत सुरू असलेल्या चौकशीस पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी पाच दिवसांची मुदतवाढ दिल्यानंतर गुरुवारी आरटीओ प्रकरणात चार शासकीय अधिकारी( MVI),तीन खाजगी इसम व तक्रारदार यांचे जबाब नोंदवले गेले.
प्रादेशिक परिवहन विभागातील गैरव्यवहाराचे आरोपावरुन चर्चेत आलेले निलंबित वाहन निरीक्षक गजेंद्र पाटील आज हजर झाले. उपायुक्त संजय बारकुंड यांनी त्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने जबाब घेतला. सोमवारपासून त्यांची चौकशी सुरु आहे.
प्रादेशिक परिवहन विभागातील कथित गैरव्यवहार प्रकरणात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने आतापर्यंत अनेक जणांचे जबाब नोंदविले आहेत. पदोन्नती आणि बदल्यांमध्ये कोट्यवधी भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप निलंबित मोटर वाहन निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी केल्यानंतर ही चौकशी सुरु आहे.