जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– ज्या वाहनाची नोंदणी १ एप्रिल २०१९ पूर्वी झालेली आहे अशा सर्व वाहन धारकांनी आपल्या वाहनास हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (HSRP) दिनांक ३१ मार्च २०२५ पूर्वी बसवून घेणे अनिवार्य आहे.
हाय सिक्युरिटी नंबर प्लेट ( (HSRP) घेण्यापुर्वी आपले वाहन संगणक प्रणाली Vahan ४.० वर आहे का याची खात्री parivahan.gov.in साईटवर भेट देवून करावी तसेच आपला मोबाईल संगणक प्रणालीवर आपल्या वाहनाचे माहितीशी जोडला गेला आहे याची वाहन संगणक प्रणाली vahan. ४० खातरजमा करावी तसे नसल्यास संबंधित नोंदणी प्राधिकरणाशी संपर्क साधून माहिती अद्ययावत करावी. असे आवाहन सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रविण बागडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसविण्याकरिता https://transport. maharashtra.gov.in या लिंकचा वापर करायचा आहे.
या जिल्ह्यातील सर्व शासकिय, निमशासकीय कार्यालय , बँका, स्थानिक स्वराज्य संस्था, शैक्षणिक संस्था, सेवाभावी संस्थांना आपल्या वाहनास हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (HSRP) ३१ मार्च २०२५ पूर्वी बसवून घेणे अनिवार्य आहे.
दुचाकी वाहन व ट्रॅक्टरकरिता ४५० रुपये, तीन चाकी वाहनाकरिता ५०० रुपये व सर्व प्रकारच्या चारचाकी वाहनांकरिता ७४५ रुपये इतके शुल्क भरावे लागणार आहे. अधिकृत HSRP फिटमेंट केंद्रावर वाहन मालकांना HSRP बसविण्याची सेवा नाकारता येणार नाही. तसेच वाहनाकरीता अदा केलेली रक्कम केवळ ३ महिन्यानकरीता वैध राहणार आहे. अधिक माहिती करिता 91-9510973540 या क्रमांकावर किंवा [email protected] या मेल आयडीवर संपर्क करावा असे आवाहन वाहनधारकांना करण्यात आले आहे.