नाशिक – प्रादेशिक परिवहन विभागातील गैरव्यवहाराचे आरोपावरुन चर्चेत आलेले निलंबित वाहन निरीक्षक गजेंद्र पाटील आज पोलिस आयुक्तांपुढे हजर झाले. आज उपायुक्त संजय बारकुंड यांनी त्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने जबाब घेतला.मात्र दुपारी पाटील यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना उद्या चौकशीसाठी पून्हा बोलावले आहे. दरम्यान उद्याच परिवहन विभागाचे सहसचिव प्रकाश साबळे यांचीही चौकशी होणार आहे. अशी माहिती पोलिस उपायुक्त संजय बारकुंड यांनी दिली.
प्रादेशिक परिवहन विभागातील कथित गैरव्यवहार प्रकरणात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने अगोदरच आरोप झालेल्या दहा जणांचे जबाब नोंदविले आहेत. त्यात परिवहन आयुक्तांचाही समावेश आहे. पदोन्नती आणि बदल्यांमध्ये कोट्यवधी भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप निलंबित मोटर वाहन निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी केला आहे.
या प्रकरणी पोलिसांकडून चौकशीला बगल देण्याचा प्रयत्न होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवून या प्रकरणाची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभागाद्वारे (सीबीआय) चौकशी करावी, अशी याचिका निलंबित गजेंद्र पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यामुळे उद्या ते हजर झाल्यानंतर काय बोललात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
पोलिस उपायुक्त संजय बारकुंड यांनी निलंबित वाहन निरीक्षक गजेंद्र पाटील आज पोलिस आयुक्तांपुढे हजर झाले. पण, त्यानंतर काय झाले याबद्दलची माहिती व्हिडिओत दिली आहे.