मंगळवार, सप्टेंबर 30, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

रा. स्व. संघ ही सर्वसमावेशक संघटना…राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

by Gautam Sancheti
जून 20, 2025 | 4:51 pm
in संमिश्र वार्ता
0
Governor releases book 01 51 1024x615 1

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- रा.स्व. संघ हे उच्चवर्णीयांची संघटना आहे हा हेतूपुरस्सर पसरवलेला गैरसमज आपल्या पुस्तकातून दूर करताना संघ ही सर्वसमावेशक संघटना असल्याची वस्तुस्थिती रमेश पतंगे यांनी आपल्या पुस्तकातून अधोरेखित केली आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी केले.

लेखक व विचारवंत रमेश पतंगे लिखित ‘व्हाय आर वी इन द आरएसएस?…. ‘ या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल राधाकृष्णन यांच्या हस्ते राजभवन येथे संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.

पूर्वी संघासाठी कार्य करणाऱ्यांना शासनात पदे स्वीकारता येत नसत, असे सांगून आज देशाचे पंतप्रधान, अनेक राज्यांचे राज्यपाल व मुख्यमंत्री राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

देशात भूकंप, नैसर्गिक आपदा व रेल्वे अपघात होतात त्यावेळी संघाचे स्वयंसेवक नेहमीच सेवा कार्यात अग्रेसर असतात, असे राज्यपालांनी सांगितले.

उत्तर पूर्वेच्या राज्यातील लोकांना देशाच्या मुख्य प्रवाहाशी भावनेने जोडण्याचे काम रा.स्व. संघ करीत असल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले.राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपल्या स्थापनेचे शताब्दी वर्ष साजरे करीत असताना रमेश पतंगे यांचे संघावरील पुस्तक प्रकाशित होत असल्याबद्दल आनंद व्यक्त करताना राज्यपालांनी लेखक पतंगे तसेच अनुवादक डॉ अश्विन रांजणीकर यांचे अभिनंदन केले.

यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी पुस्तकातील निवडक उतारे वाचून दाखवले तर ‘आम्ही संघात का आहोत …’ या श्री.पतंगे यांच्या मूळ मराठी पुस्तकाचे अनुवादक डॉ. अश्विन रांजणीकर यांनी आपले विचार व्यक्त केले.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी तसेच उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी हे देखील पूर्वी संघ प्रचारक होते.

रा. स्व. संघ आपल्या स्वयंसेवकांना भारत मातेच्या गौरवासाठी काम करण्यास सांगतो, या कारणास्तव आपण आयुष्यभर संघासाठी कार्य केले, असे रमेश पतंगे यांनी सांगितले. पुस्तकाचे भाषांतर सर्व प्रमुख भारतीय भाषांमध्ये होणार असल्याची माहिती श्री. पतंगे यांनी यावेळी दिली. रा. स्व. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त ‘साप्ताहिक विवेक’तर्फे प्रकाशित या पुस्तकाला सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची प्रस्तावना आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धरणगावमध्ये ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन

Next Post

सीबीआयने बनावट नोटा प्रकरणातील या आरोपीला इंटरपोल चॅनेलद्वारे युएईहून परत आणले…

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

Maha Gov logo 07 1 1024x512 1
संमिश्र वार्ता

जिल्हा परिषद शिक्षकातून ‘केंद्र प्रमुख’ पदांवर नियुक्तीसाठी या तारखेदरम्यान ऑनलाईन परीक्षा

सप्टेंबर 30, 2025
fir111
क्राईम डायरी

पत्नीच्या पैश्यांवर पतीचा डल्ला, तब्बल अडिच लाख रूपये परस्पर काढून घेतले, गुन्हा दाखल

सप्टेंबर 30, 2025
crime 88
क्राईम डायरी

घरफोडीत चोरट्यांनी सुमारे १७ लाखाच्या रोकडवर मारला डल्ला…सातपूर येथील घटना

सप्टेंबर 30, 2025
DEVENDRA
मुख्य बातमी

मॅन्युअलमध्ये ओला दुष्काळ कुठेही नाही, पण, दुष्काळाच्या सर्व सवलती लागू करण्याचा निर्णय…मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची माहिती

सप्टेंबर 30, 2025
Screenshot 20250729 142942 Google
महत्त्वाच्या बातम्या

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत झाले हे महत्त्वपूर्ण ५ निर्णय…

सप्टेंबर 30, 2025
Untitled 48
संमिश्र वार्ता

दहातोंडी रावणाचे १०० वर्षे जुने मंदिर… फक्त दसऱ्याच्या दिवशीच होते दर्शन…

सप्टेंबर 30, 2025
IMG 20250930 WA0319 1
स्थानिक बातम्या

नाशिकहून गुजरात, राजस्थान व हरियाणा राज्यांना थेट रेल्वे सुरु करा…ही असोसिएशन घेणार रेल्वे मंत्र्यांची भेट

सप्टेंबर 30, 2025
IMG 20250930 WA0248
स्थानिक बातम्या

निमामध्ये मोठ्या उद्योगांसाठी प्रथमच स्वतंत्र बैठक…मोठ्या उद्योगांच्या सुविधांवर चर्चा

सप्टेंबर 30, 2025
Next Post
cbi

सीबीआयने बनावट नोटा प्रकरणातील या आरोपीला इंटरपोल चॅनेलद्वारे युएईहून परत आणले…

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011