नाशिक – रा.स्व.संघ जनकल्याण समिती, आयुर्वेद सेवा संघ आणि नाशिक महानगर पालिका यांच्या संयुक्त सहकार्याने हॉटेल राॅयल हेरीटेज, खडकाळी सिग्नल जवळ, गंजमाळ येथे ५० बेड्सचे ‘कोविड केअर सेंटर’ (विलगीकरण कक्ष) सूरु होत आहे. सदर ‘कोव्हिड सेंटर’ हे रविवार २५ एप्रिल रोजी वर्धमान महावीर जयंतीच्या मुहूर्तावर सूरु करण्यात येणार आहे.
या ‘कोविड सेंटरवर’ जे कोविड पॉझिटिव्ह आणि लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी की ज्यांना होम आयसोलेशन मध्ये रहाण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला आहे अशांना दाखल करुन घेतले जाईल. रुग्णास दाखल करुन घ्यायचा निर्णय योग्य तपासणीनंतर सर्वस्वी ‘कोविड सेंटर’ वरील डॉक्टरांच्या सल्ल्याने होईल. ‘कोविड सेंटर’ वर साधारण आठ ते दहा दिवसाच्या अवधीसाठी रुग्णाला दाखल करुन घेतले जाईल. रुग्ण कोविड सेंटरवर असतांना त्याच्यासाठी आहार, वैद्यकीय काढे, जरुरीप्रमाणे व्यायाम तसेच त्यांची मनस्थिती सकारात्मक रहावी यासाठीचे कार्यक्रम ह्याचे दिवसभराचे नियोजन ‘कोविड सेंटर’ डॉक्टर्स आणि प्रशासनाने केले आहे.
वरील सेवा ही निःशुल्क असेल!
नागरिकांनी *’कोविड केअर सेंटर’ (विलगीकरण कक्ष)* सुविधेचा लाभ घेण्यासाठी पुढील क्रमांकावर संपर्क करावा: 8446599311 आणि 8446599211
रक्तदान शिबिर १८ एप्रिलला
वरील उपक्रमाबरोबरच सध्याच्या परीस्थीतीतील रक्त तूटवडा लक्षात घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती तर्फे नाशिकरोड भागात १८ एप्रिल २०२१ ला कोव्हिडचे प्रोटोकाल पाळून ‘रक्तदान शिबीर’* आयोजित केले होते, ह्यात ३८ स्वयंसेवकांनी रक्तदान केले. तसेच आज ऑक्सिजन सिलींडर्स, ऑक्सिजन काँन्सन्ट्रेटर्स आणि प्लाझ्मा डोनेशन हे सिव्हिअर करोनाबाधित रुग्णासाठी काही प्रमाणात जीनदायी ठरु लागले आहे.
१५ ‘आॕक्सिजन कॉन्सेंट्रेटर
अशा परीस्थीतीत जनकल्याण संकूल उत्तमनर येथील रुग्णोपयोगी साहित्यकेंद्रात रा. स्व. संघ जनकल्याण समितीच्या माध्यमातून आपण १५ ‘आॕक्सिजन कॉन्सेंट्रेटर विकत घेतले आहेत. व ते आपण करोनाबाधीत गरजूंना डिपाझिट ठेवून घेऊन विनामूल्य घरी वापरायला देणे सूरु केले आहेत. नजिकच्या काळात आजून ५० आक्सिजन कॉन्सेंट्रेटर जनकल्याण संकूलमधे उपलब्ध करण्याचे नियोजन आहे.
‘प्लाझ्मा*’ डोनेशन करावे.
कोरोनाबाधित वरील गरज आसलेल्यांनी अंकूशजी बडशीले +919890060762 यांच्याशी संपर्क करावा. शौनक गायधनी आणिआभिषेक पिंगळे या स्वयंसेवकांनी समविचारी स्वयंसेवकांची टीम ‘जनकल्याण समिती – नाशिक’ ह्या WA ग्रुपखाली संघटित केली. या टीमच्या प्रयत्नातून दूस-या कोरोना लाटेत आतापर्यंत जवळ जवळ ६०-६५ करोना बाधितांना ‘प्लाझ्मा डोनर’ उपलब्ध करुन देण्यात आले.तसेच याच टीमतर्फे समाजातील जास्तीत जास्त कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी पूढे येऊन *’प्लाझ्मा*’ डोनेशन करावे. यासाठी ठिकठिकाणी आवाहन करण्यात येत आहे. ब-या झालेल्या रुग्णांशी संवाद साधून त्यांना प्लाझ्मा दानासाठी त्यासंबंधी माहिती देऊन प्रोत्साहित केले जात आहे.
लसीकरणाची मोहिमसाठी प्रयत्न
तसेच जवळ जवळ ४० जणांना घरी आॕक्सिजन कॉन्सेंट्रेटर अथवा जंबो सिलींडरची सोय करुन दीली आहे.या व्यतिरीक्त भारत सरकारने पूरस्कृत केलेल्या लसीकरणाची मोहिम सक्षम व्हावी म्हणून रास्व संघ नाशिक शहर महविद्यालयीन प्रमूख विक्रमजी थोरात ह्यांनी शहरातून साधारण ३०० जणांची टीम तयार केली. यात प्रत्येक स्वयंसेवकाने फक्त एकच दिवस दूपारी १ ते संध्याकाळी ६ वाजे पर्यंत काम करायचे आहे. कामाचे स्वरुप लसीकरणासाठी आलेल्या लोकांची नोंदणी करणे. त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करणे. आणि लसीकरण झाल्यावर अर्धातास त्यांना निरीक्षण कक्षात विलग ठेऊन त्यांच्याशी संवाद साधणे. दररोज असे किमान ५ ते जास्तीत जास्त १० स्वयंसेवक या उपक्रमा अंतर्गत श्रीगूरुजी रुग्णालयातील लसीकरण व्यवस्थापनात सहभागी होत आहेत. याच बरोबर पहिल्या लाटेप्रमाणे लोकांना टिफीन, घरपोच औषधे देणा-या स्वयंसेवकांबद्दल आणि संस्थांबद्दल माहिती देणे. वेगवेगळ्या भागात अँब्यूलन्सची माहिती देणे असे स्थनिक पातळीवरचे प्रयत्न चालूच आहेत.