मुंबई (इंडिया दर्पण वृतसेवा) – भारतीय नागरिक या चित्रपटाचे शौकीन असल्याचे म्हटले जाते एखादा चित्रपट आवडला तर ते इतके डोक्यावर घेतात की तो चित्रपट रेकॉर्डब्रेक होतो सध्या देखील एका चित्रपटाविषयी अशी चर्चा सुरू आहे. एस.एस. राजामौली यांचा आरआरआर हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. या चित्रपटाच्या कमाईने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. राजामौली यांच्या चित्रपटाने 1000 कोटींचा आकडा पार केला आहे.
भारतीय चित्रपटसृष्टीसाठी अतिशय अभिमानाची बाब असून RRR ने जगभरात 1 हजार कोटींहून अधिक कमाई केली आहे. या सुपरहिट चित्रपटात राम चरण, ज्युनियर एनटीआर मुख्य भूमिकेत आहेत. यासोबतच बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि अजय देवगण यांनीही या चित्रपटात भूमिका निभावली आहे. अर्थात, आलिया भट्ट आणि अजय देवगण यांची व्यक्तिरेखा फार मोठी नसली तरी चित्रपटात या दोघांची भूमिका असणे ही एक मोठी गोष्ट आहे.
याआधी दंगल आणि बाहुबली 2: द कन्क्लूजनने जागतिक स्तरावर खूप कमाई केली होती. त्यानंतर हा चित्रपट 1000 कोटींचा गल्ला गाठणारा तिसरा चित्रपट ठरला आहे. पण या चित्रपटाने RRRच्या अवघ्या 18 दिवसांत इतकी कमाई केली आहे की, चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार आहे.
ट्विटरवरही या चित्रपटाच्या कलेक्शनची जोरदार चर्चा आहे. चित्रपटाच्या अधिकृत ट्विटर पेजवरही चित्रपटाच्या कमाईची माहिती देण्यात आली. यामध्ये नागरीकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी ज्युनियर एनटीआरला चित्रपटाचे सर्वेसर्वा म्हटले आहे. त्याचबरोबर चित्रपटातील राम चरणच्या राम अवताराचे अनेकजण कौतुक करत आहेत.
रेवंत कुमार यांनी लिहिले, “भारतीय चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाची बाब आहे. एसएस राजामौली भारतीय चित्रपटाच्या इतिहासात तुमचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिले जाईल. मनोज तारक यांनी लिहिले, आरआरआर भाग 2 आता वाट पाहत आहे. राजामौलींच्या ‘RRR’ चित्रपटाने बंपर कमाई केली, अभिनेता राम चरणने क्रू मेंबर्सना लाखो रुपयांची सोन्याची नाणी दिली. याशिवाय ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनीही चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल ट्विट केले आहे. ज्युनियर एनटीआर फॅनपेजने लिहिले की, आता जगाला कळेल की एनटीआर काय आहे.