इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सिनेमा निर्मितीमधील चेन्नईतील सर्वात मोठी कंपनी असलेल्या लायका प्रॉडक्शन संस्थेवर अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने छापे टाकले. लायका प्रॉडक्शन हे दक्षिण भारतातील सर्वात मोठं प्रॉडक्शन हाऊस आहे. एसएस राजामौली यांचा आरआरआर, अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा: द राइज’, रजनीकांतचा २.० आणि मणिरत्नम यांनी दिग्दर्शित ‘पोन्नियिन सेल्वन’ असे अनेक हिट चित्रपट या संस्थेने दिले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लायका प्रॉडक्शनच्या परिसरात छापे घातले जात आहेत. मात्र, या छाप्यांबाबत प्रॉडक्शन कंपनीकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
बड्या बड्या राजकीय नेत्यांवर ईडीची कारवाई होणार असल्याच्या बातम्या अलीकडे मोठ्या प्रमाणात दिसतात. त्याच यादीत आता चित्रपट निर्माते देखील आलेले दिसतायत. राजकीय नेत्यांबरोबरच आता चित्रपट निर्मात्यांवरही ईडीची धाड पडायला सुरुवात झाली आहे.
या प्रॉडक्शन हाऊसविरुद्ध केंद्रीय तपास यंत्रणांनी मनी लाँड्रिंगचा गुन्हा नोंदवल्यानंतर चेन्नईतील सुमारे आठ विभागात तपास सुरू आहे.
लायका प्रॉडक्शनची स्थापना २०१४ मध्ये सुबास्करन अलीराजा यांनी केली होती. लायका प्रॉडक्शन ही लायका मोबाइल कंपनीची उपकंपनी आहे. टी नगर, अड्यार आणि करपक्कमसह लायकाच्या आठ ठिकाणांवर ईडीनं ही छापेमारी केली आहे. ईडीचा हा छापा फेमा उल्लंघनाशी संबंधित प्रकरणात टाकण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये पीएमएलए शुल्काचाही समावेश करण्यात केला आहे.
गेल्या काही वर्षांत या कंपनीच्या बॅनरखाली तयार झालेले कित्येक चित्रपट सुपरहिट ठरले. राजामौली यांचा बहचर्चित ‘आरआरआर’ LYCA प्रॉडक्शन या बॅनरखालीच बनला. नुकताच प्रदर्शित झालेल्या मणिरत्नम यांच्या ‘पोन्नियिन सेल्वन’ या चित्रपटानेही रेकॉर्ड ब्रेक कमाई केली.
RRR Movie Producer ED Raid Production House