मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आजच्या काळात स्वतःचे वाहन विशेषतः कार असावी असे बहुतांश नागरिकांना वाटते त्यातच आकर्षक, दणकट आणि सर्व सोयीसुविधांनी युक्त आशा कार खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढलेला दिसतो. विशेषतः बॉलिवूडमधील सेलिब्रिटी म्हणजे कलाकार, दिग्दर्शक, निर्माते यांच्याकडे अशा प्रकारच्या कार दिसून येतात. त्यामुळे तरुणाईमध्ये देखील अशा प्रकारचे आकर्षण आढळून येते.
बाहुबली आणि RRR सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट बनवणारे दक्षिण भारतीय दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी नवी कार खरेदी केली आहे. ही व्होल्वो XC40 एक कॉम्पॅक्ट लक्झरी एसयूव्ही आहे. कंपनीच्या एंट्री-लेव्हल SUV ची किंमत 44.50 लाख रुपये (एक्स-शोरूम ) आहे.
या कारची थेट स्पर्धा BMW X1 आणि Audi Q3 सारख्या एसयूव्हीशी कायम आहे. राजामौली यांची कार फ्युजन रेड कलर आणि ब्लॅक रुफमध्ये आहे. याशिवाय, हे इतर चार रंग पर्यायांमध्ये देखील उपलब्ध आहे – ओनिक्स ब्लॅक, डेनिम ब्लू, ग्लेशियर सिल्व्हर आणि क्रिस्टल व्हाइट.
SUV मध्ये 2.0-लिटर चार-सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे जे 187 bhp आणि 300 Nm पीक टॉर्क बनवते. इंजिन 8-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. याशिवाय, कंपनी XC40 रिचार्ज, या SUV ची पूर्णपणे इलेक्ट्रिक आवृत्ती काही महिन्यांत भारतात सादर करेल. तसेच हे पूर्णपणे बॅटरीवर चालणारे वाहन असेल.
या कारमध्ये 12.3-इंचाची वर्टिकल टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि हरमन कार्डन 14-स्पीकर साउंड सिस्टम आहे. यात पॅनोरामिक सनरूफ, वायरलेस चार्जिंग, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल आहे. याशिवाय 7 एअरबॅग्ज, डिस्टन्स अलर्ट, पार्क असिस्ट आणि रडार-आधारित सिटी सेफ्टी आणि स्टीयरिंग असिस्टसह ड्रायव्हर-असिस्ट सिस्टीम यांसारखी सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत.