मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मध्य रेल्वेच्या लोहमार्गावरील महत्वाचे जंक्शन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनमाड रेल्वे स्थानकात मोठा प्रकार उघडकीस आला आहे. फ्लॅटफॅार्म क्रमांक एकवर गस्त घालणाऱ्या रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांना संशय आल्याने दोन प्रवाशांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे २ लाख ५२ हजाराचा २१ किलो गांजा सापडले. या घटनेमुळे स्थानकात एकच खळबळ उडाली.
रेल्वे सुरक्षा बलाचे जवान गस्त घालत असताना मनमाड स्थानकातील फलट क्रमांक एक वर गोवा एक्सप्रेस यावेळेस दोन संशयित असे मिळून आले त्यांना रेल्वे सुरक्षा बलाचे ऑफिसमध्ये आणल्यानंतर त्यांच्याकडे बॅगांमध्ये गांजा आढळून आला. त्यानंतर त्यांना लोहमार्ग रेल्वे पोलीस स्थानक येथे घेऊन आले असता त्याची सविस्तर खात्री केली असता त्यांच्याकडे एकूण २१ किलो वजनाचा २ लाख ५२ हजार रुपये किमतीचा गांजा मिळून आला.
काकीनाडा येथून मनमाड स्थानकात उतरल्यानंतर राजस्थानकडे रवाना होत असल्याचे माहिती देखील समोर आली आहे. खात्री झाल्यानंतर अशोक कुमार भवरलाल (रा. राजस्थान) व सत्यवीर राम खिलाडी (रा. उत्तर प्रदेश) या दोघांना ताब्यात घेऊन बेकायदेशीर गांजा जवळ बाळगून वाहतूक करताना मिळून आल्याने त्यांच्यावर NDPS कायद्यान्वये मनमाड लोहमार्ग पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघमोडे करीत आहे.
सदरची कारवाई रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरीक्षक शिरीष ढेंगे, उपनिरीक्षक समाधान वाहुळकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक निलेश सोमवंशी,चतुर मासुळे, विलास बर्डे,लोहमार्ग पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक काजवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद जोगदंड ,सोमनाथ वाघमोडे ,पोलीस हवालदार दिनेश पवार ,गोविंद दाभाडे पोलीस नाईक किशोर कांडेले,महेंद्र पाटील,संतोष भालेराव, राज बच्छाव,राजेश जाधव,अमोल खोडके यांनी पार पाडली.