मुंबई – साधारणपणे कोणतेही उत्पादन करणारी कंपनी आपला माल हा दर्जेदार असावा, यासाठी प्रयत्न करते. तसेच या उत्पादित मालामध्ये काही त्रुटी आढळल्यास ग्राहकांचा अविश्वास निर्माण होऊ शकतो, त्यामुळे असे होऊ नये म्हणून काळजी घेते. प्रसंगी या माला मध्ये काही त्रुटी आढळल्यास तो माल परत देखील बोलावते. विशेषतः इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिक आणि अन्य वाहनांच्या बाबतीत असे घडताना दिसून येते. काही महिन्यांपूर्वीच महिंद्रा कंपनीने आपल्या वाहनांमध्ये त्रुटी आढळल्याने ती वाहने परत बोलावली होती. सध्या एका लोकप्रिय दुचाकी संदर्भात देखील अशीच असाच प्रकार घडला आहे.
यात आहे समस्या
रॉयल एनफील्ड ही दणकट, आकर्षक आणि शक्तिशाली मोटरसायकल बनवणारी आपल्या देशातील एक लोकप्रिय कंपनी असून तिच्या सर्वोत्तम विक्री होणाऱ्या बाईक क्लासिक 350 च्या ग्राहकांसाठी एक अतिशय महत्त्वाची माहिती शेअर केली आहे. या वर्षी कंपनीने आपल्या सर्वात लोकप्रिय बाईक क्लासिक 350 चे नेक्स्ट जनरेशन मॉडेल लॉन्च केले. मात्र आता दि. 1 सप्टेंबर ते 5 डिसेंबर 2021 पर्यंत, कंपनीने त्यांच्या वाहनाच्या स्विंग आर्मला जोडलेल्या सिंगल चॅनल ABS आणि मागील ड्रम ब्रेक प्रकारांसह क्लासिक 350 च्या ब्रेक रिअॅक्शन ब्रॅकेटमध्ये समस्या असल्याचे म्हटले आहे.
तांत्रिक टीमला यश
रॉयल एनफिल्डने ब्रेक रिअॅक्शन ब्रॅकेटमधील समस्येमुळे क्लासिक 350 मोटरसायकलच्या 26,300 युनिट्स परत मागवल्या आहेत. रॉयल एनफिल्डच्या तांत्रिक टीमला असे आढळून आले आहे की मोटरसायकलच्या स्विंग आर्मला जोडलेले ब्रेक रिअॅक्शन ब्रॅकेट एखाद्या विशिष्ट राइडिंग स्थितीत जीर्ण झाले असावे. मागील ब्रेक पेडलवर अपवादात्मकपणे उच्च ब्रेकिंग लोड लागू केल्यास, ते नुकसान करू शकते. यामुळे ब्रेकिंगचा मोठा आवाज येऊ शकतो आणि त्यामुळे अत्यंत जलद परिस्थितीत ब्रेकिंग कमी होते, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. या कारणांमुळे कंपनीने 26 हजारांहून अधिक युनिट्स दुरुस्तीसाठी परत मागवले आहेत.
हेल्पलाइन क्रमांक जारी
रॉयल एनफिल्डची सेवा संघ आणि स्थानिक डीलरशिप या कालावधीत उत्पादित केलेल्या बाइक्सच्या यादीत ज्यांच्या बाईकचा समावेश आहे अशा ग्राहकांशी संपर्क साधण्यास सुरुवात करतील. माहितीची पडताळणी करण्यासाठी कंपनीने हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे. 1800 210007 वर कॉल करून ग्राहक माहिती मिळवू शकतात.
शक्य तितक्या लवकर सोडवणार
सदर समस्याही क्लासिक 350 मॉडेलमधील सिंगल-चॅनल ABS, रिअर ड्रम ब्रेकमध्ये आहे, या वर्षी 1 सप्टेंबर ते 5 डिसेंबर दरम्यान तयार करण्यात आले होते. स्विंग आर्मचे ब्रेक रिअॅक्शन ब्रॅकेट निश्चित करण्यासाठी या मोटारसायकली परत मागवल्या जात आहेत. तसेच कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, अशा समस्या अत्यंत कमी प्रमाणात येऊ शकतात आणि आम्ही त्या शक्य तितक्या लवकर सोडवू.