अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
आषाढी एकादशी व बकरी ईद हे एकाच दिवशी येत असल्याने दोन्ही समाजात शांततेचे वातावरण राहावे म्हणून नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस सतर्क झाली असून सटाणा तालुक्यातील जायखेडा पोलिसांचा नामपूर शहरातून रूटमार्च काढण्यात आला तर जमावाला काबूत आणण्यासाठीचे प्रात्यक्षिक सुध्दा वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीत घेण्यात आले.