नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रोटरी क्लब ऑफ नाशिक एअरपोर्टच्या अध्यक्षपदी वैशाली जाधव तर सचिवपदी रोटेरियन दिपक भुरे यांची निवड करण्यात आली आहे. रोटरी क्लबचे मावळते अध्यक्ष रोटेरियन डॉ. ममता सुराणा व सचिव रोटेरियन लोकेश लूणावत यांचा कार्यकाळ संपल्याने नवीन पदाधिकारी निवडण्यात आले.
हे नवे पदाधिकारी आज आपली सूत्रे मावळते अध्यक्ष व सचिव कडून स्वीकारणार आहेत. २५ जून रोजी सायंकाळी हॉटेल नाशिक इन येथे सात वाजता हा पदग्रहण सोहळा होणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून डिस्ट्रिक्ट गव्हर्नर नामनिर्देशित राजिंदर सिंह खुराणा हे उपस्थितीत राहणार आहे. यावेळी ते मार्गदर्शन करणार आहे.