नाशिक – महिलांना स्वतः साठी एक हक्काचा दिवस मिळावा आणि यातून त्यांना मनसोक्त आनंद लुटता यावा यासाठी रोटरी क्लब ऑफ नासिक नॉर्थतर्फे शनिवारी (दि.१६) स्त्री तरंग आनंद मेळाव्याचे वैराज कलादालन येथे सकाळी १२ ते संध्याकाळी ७ या वेळेत आयोजन करण्यात आले आहे.
आर्किटेक्ट अँड इंजिनीअर्स असोसिएशन हॉलमध्ये महिलांना सेल्फ मेकअप, हेल्दी कुकिंग, टिक टॉक नेलं आर्ट याचे लाईव्ह डेमो या बरोबरच मेहंदी, टॅटू, टॅरोट कार्ड रिडींग, फन गेम्सचा आनंद घेता येणार आहे. तसेच या वेळी संचयातून समृद्धीकडे या द्वारे महिलांना आपल्या जमापुंजीतील पैशांची योग्य इन्व्हेस्टमेंट कशी करावी यावर व्याख्यान आयोजित केले आहे. या मेळाव्यात फॅशन वेअर, ज्वेलरी, कॉस्मेटिक्स, कुक वेअर, क्रिस्टल हिलींग तसेच फूड कोर्ट चे स्टॉल्स असणार आहेत.
या मेळाव्यात घरगुती व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांसाठी एक हक्काचा प्लॅटफॉर्म मिळण्यास मदत होईल असा प्रयत्न रोटरी क्लब ऑफ नाशिक नॉर्थ तर्फे करण्यात येत आहे. मेळाव्यास प्रवेश विनामूल्य असून आलेल्या महिलांना लकी ड्रॉ द्वारे बक्षिसे जिंकण्याचीही सुवर्णसंधी मिळणार आहे.त्याच बरोबर आदिती पैठणी यांच्यातर्फे पाचशे रुपयाचे डिस्काऊंट कुपन प्रत्येक आलेल्या महिलेला देण्यात येणार आहे . तसेच दोन पैठण्या लकी ड्रॉ मध्ये जिंकण्याची सुवर्णसंधी महिलांना लाभेल.या मेळाव्यातून जमा झालेला निधी नाशिक जिल्ह्यातील अनाथ आश्रमातील मुलींसाठी लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंसाठी वापरण्यात येणार आहे.सर्व महिलांनी मेळाव्याचा आनंद घ्यावा,असे आवाहन रोटरी क्लब ऑफ नासिक नॉर्थचे अध्यक्ष रोटे. उमेश राठोड व सेक्रेटरी रोटे. गीता पिंगळे यांनी केले आहे.