नाशिक : रोटरी क्लब ऑफ नाशिक आणि रिंग प्लस अॅक्वा लि. (रेमंडस ग्रुप) यांच्या संयुक्त विद्यमाने सिव्हिल हॉस्पिटलमधील नवजात शिशु विभागास सहा बेडसाईड पल्स ऑक्सिमिटर मशीन प्रदान करण्यात आले. मनीनोत प्रांतपाल डॉ. आनंद झुनझुनवाला यांच्या हस्ते या मशीनचे उदघाटन झाले.
शिशु विभागात बेडसाईड पल्स ऑक्सिमिटर मशीनची नितांत गरज होती. नाशिक शहर व जिल्ह्याची ही गरज लक्षात घेवून रोटरी क्लब ऑफ नाशिकने सामाजिक भावनेतून हे मशीन्स पुरवण्याचे मान्य करत रेमंडस ग्रुपच्या रिंग प्लस अॅक्वा लि. ने सीएसआरच्या अंतर्गत तातडीने आर्थिक मदत देऊ केली. याबद्दल जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी आनंद व्यक्त केला. याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या अध्यक्षा मुग्धा लेले, सचिव प्रफुल बरडिया, विजय दिनानी, उपप्रांतपाल कुणाल शर्मा, मनीनोत अध्यक्ष. डॉ. श्रिया कुलकर्णी, माजी अध्यक्ष दिलीपसिंग बेनिवाल, ओमप्रकाश रावत, रिंग प्लस अॅक्वाचे प्लॅन्ट हेड कमलाकर टाक, कीर्ती टाक, सिव्हिल हॉस्पिटलचे डॉ. पंकज गाजरे आदी मान्यवरांच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पडला. रोटरीचे सचिव तथा सीएसआर संचालक प्रफुल बरडिया यांनी यासाठी सर्वांचे आभार व्यक्त केले. काही महिन्यांपूर्वीच याप्रसंगी नवजात शिशुसाठी चार सी-पेप मशीन व पोर्टेबल एक्स रे मशीन रोटरी क्लबने प्रदान केले होते. १३ नवजात शिशुचें प्राण वाचवण्यासाठी या मशीन्सचा अत्यंत उपयुक्त ठरल्याचे सिव्हिल हॉस्पिटलच्या प्रशासनाने सांगितले.