मंगळवार, ऑगस्ट 5, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

ओबेन इलेक्ट्रिकने नेक्स्ट-जेन रॉर ईझी सिग्मा लाँच केली…या तारखेपासून डिलिव्हरीला सुरुवात

by Gautam Sancheti
ऑगस्ट 5, 2025 | 7:04 pm
in संमिश्र वार्ता
0
Rorr EZ Sigma Electric Red I 16 9

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- ओबेन इलेक्ट्रिक या भारतातील स्वदेशी संशोधन आणि विकास-चालित इलेक्ट्रिक मोटरसायकल उत्पादक कंपनीने आज रॉर ईझी सिग्मा (Rorr EZ Sigma) – ही धाडसी इलेक्ट्रिक, पुढच्या पिढीची इलेक्ट्रिक प्रवासाची मोटरसायकल मर्यादित कालावधीसाठी रुपये १.२७ लाख पासून सुरू होणाऱ्या विशेष प्रारंभिक किंमतीत लाँच करण्याची घोषणा केली आहे. आधुनिक भारतीय रायडरसाठी शहरी प्रवासाची पुनर्परिभाषा करण्यासाठी डिझाइन केलेली, रॉर ईझी सिग्मा ही मजबूत कम्युटर-फर्स्ट रचनेवर आधारित आहे ज्यामुळे रॉर ईझी यशस्वी झाली आहे, अनुभव आणि उपयुक्तता दोन्ही वाढवण्यासाठी प्रमुख हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर अपग्रेड सादर करण्यात आले आहे.

नवीन वैशिष्ट्यांमध्ये रिव्हर्स मोडचा समावेश आहे ज्यामुळे शहरी भागात सहज हालचाल करता येते, तर ५-इंचाचा टीएफटी कलर डिस्प्ले, बिल्ट इन नेव्हिगेशन, ट्रिप मीटर,कॉल, मेसेज आणि संगीत रिअल-टाइम अलर्टसह डॅशबोर्डवरील परस्परसंवाद वाढवतो. कामगिरीच्या दृष्टीने पुन्हा डिझाईन केलेली सीट दीर्घ प्रवासात अधिक आराम देते, तर अधिक ठळक डिझाइन ग्राफिक्स आणि नवीन इलेक्ट्रिक रेड कलर, फोटॉन व्हाइट, इलेक्ट्रो अंबर आणि सर्ज सायन या विद्यमान कलर पॅलेटमध्ये नवीन ऊर्जा आणतात.

दोन बॅटरी प्रकारांमध्ये उपलब्ध असलेली, रॉर ईझी सिग्मा ही, ३.४ किलोवॅट मॉडेलसाठी रुपये १.२७ लाख आणि ४.४ किलोवॅट मॉडेलसाठी रुपये १.३७ लाख या खास प्रारंभिक किंमतीत सादर करण्यात आली आहे. लाँच ऑफर कालावधीनंतर किंमती अनुक्रमे रुपये १.४७ लाख आणि रुपये १.५५ लाख असतील. ग्राहकांना इलेक्ट्रिक मोटारसायकलींच्या जगात प्रवेश मिळवून देणारी, रॉर ईझी सिग्मा रुपये २,९९९ पासून सुरू होणाऱ्या विकल्पासह उपलब्ध आहे. रॉर ईझी सिग्माची बुकिंग आता रुपये २,९९९ मध्ये करता येईल. देशभरातील ओबेन शोरूममध्ये टेस्ट राईड सुरु झाल्या असून ग्राहकांच्या डिलिव्हरी १५ ऑगस्ट २०२५ पासून सुरू होतील.

ओबेन इलेक्ट्रिकच्या संस्थापक आणि सीईओ, मधुमिता अग्रवाल म्हणाल्या, “रॉर ईझी सिग्माचे लाँचिंग हे शहरातील प्रवासाचे भविष्य घडवण्याच्या आमच्या प्रवासात एक निर्णायक पाऊल आहे. या पुढच्या पिढीच्या मॉडेलसह, आम्ही आजच्या प्रवाशांच्या सखोल अपेक्षा पूर्ण करण्यासाठी वाढीव अपग्रेडच्या पलीकडे गेलो आहोत, भारतासाठी तयार केलेल्या मोटरसायकलमध्ये बुद्धिमत्ता, आराम आणि विश्वासार्हता यांचा मेळ घालत आहोत. रॉर ईझी सिग्मा ही केवळ तांत्रिकदृष्ट्या प्रगत नसून वास्तविक जगाच्या वापराशी आणि आकांक्षांशी अर्थपूर्णपणे जुळणाऱ्या इलेक्ट्रिक मोटारसायकलींच्या अभियांत्रिकीप्रती आमची सततची वचनबद्धता प्रतिबिंबित करते.”

रॉर ईझी सिग्मा ग्राहकांना अपग्रेड केलेल्या ओबेन इलेक्ट्रिक अॅपचे एक वर्षाचे मोफत सबस्क्रिप्शन देखील मिळेल. हे कनेक्टेड अॅप रायडर्सना राईडच्या तपशीलाचा मागोवा घेण्यास, बिल्ट-इन जीपीएस आणि जिओ-फेन्सिंगसह ‘फाइंड माय रॉर’ वापरून त्यांची मोटरसायकल शोधण्यास, रिमोट डायग्नोस्टिक्समध्ये प्रवेश करण्यास, स्मार्ट अलर्ट प्राप्त करण्यास, ६८,००० पेक्षा अधिक नेटवर्कवर चार्जिंग स्टेशन शोधण्यास आणि रिमोट लॉकसह अँटी-थेफ्ट संरक्षण सक्रिय करण्यास सक्षम करते, ज्यामुळे त्यांच्या स्मार्टफोनवरून पाहण्याची संपूर्ण क्षमताआणि नियंत्रण मिळते.

तिच्या मूल्यांध्ये, रॉर ईझी सिग्मा, ओबेन इलेक्ट्रिकच्या पेटंट केलेल्या उच्च-कार्यक्षमतेचे एलएफपी बॅटरी तंत्रज्ञानाद्वारे समर्थित आहे, जे ५०% जास्त तापमान प्रतिरोधकता, दुप्पट आयुष्यमान आणि भारतातील विविध हवामानात अतुलनीय विश्वासार्हता प्रदान करते. रॉर ईझी सिग्माचे दोन्ही प्रकार ९५ किमी/ताशी कमाल वेग देतात आणि फक्त ३.३ सेकंदात ० ते ४० किमी/ताशी वेग वाढवतात. ५२ न्यूटन मीटर (एनएम) या श्रेणीतील आघाडीच्या टॉर्कसह, ही बाईक जलद अॅक्सिलरेशन आणि सुरळीत, उत्साहवर्धक राइड सुनिश्चित करते, ज्यामुळे ती शहरी वाहतुकीसाठी आदर्श बनते. १७५ किमी पर्यंतच्या आयडीसी रेंजसह आणि अ‍ॅडॉप्टिव्ह पॉवर डिलिव्हरीसाठी तीन राइड मोड – इको, सिटी आणि हॅवोक यामुळे, रॉर ईझी सिग्मा शहरातील रायडर्सना वारंवार चार्जिंग व्यत्ययाशिवाय आत्मविश्वासाने प्रवास करण्याचे स्वातंत्र्य देते. शिवाय, रॉर ईझी सिग्मा जलद-चार्जिंग क्षमतांनी सुसज्ज आहे, ज्यामुळे ती फक्त १.५ तासात ० ते ८०% चार्ज होऊ शकते.

ओबेनच्या स्वदेशी एआरएक्स फ्रेमवर बांधलेली, रॉर ईझी सिग्मा भारतीय रस्त्यांसाठी पूर्णपणे अनुकूल आहे आणि ती, उच्च २०० मिमी ग्राउंड क्लीयरन्स आणि विविध शहरी भूप्रदेशांमध्ये स्थिर आणि आरामदायी राइडसाठी ७-स्टेप अॅडजस्टेबल रियर मोनो-शॉक सस्पेंशन देते. ही रायडरच्या सुरक्षिततेवर भर देऊन डिझाइन केलेली असून यात अचूक थांबण्याच्या शक्तीसाठी युनिफाइड ब्रेक असिस्ट (यूबीए) आणि वाहन चालू असताना सिग्नल देणारी ड्रायव्हर अलर्ट सिस्टम (डीएएस) आहे. १३०/७०-१७ रुंद टायर्स, पूरग्रस्त रस्त्यांवर विश्वासार्ह कामगिरीसाठी २३० मिमी वॉटर-वेडिंग डेप्थ आणि जिओ-फेन्सिंग-बेस्ड थेफ्ट प्रोटेक्शन, बॅटरी थेफ्ट लॉक आणि पेटंट केलेले तोडफोड संरक्षण यासारख्या बुद्धिमान सुरक्षा वैशिष्ट्यांमुळे सुरक्षितता आणखी वाढली आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

गिफ्ट हाऊसमध्ये बालकामगार, व्यावसायीकास पडले चांगलेच महागात…गुन्हा दाखल

Next Post

आंदोलनानंतर फुटलेल्या मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम बुधवारी सुरू होणार

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
IMG 20250805 WA0276 1

आंदोलनानंतर फुटलेल्या मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम बुधवारी सुरू होणार

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना धनलाभाचे संकेत मिळतील, जाणून घ्या, बुधवार, ६ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 5, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1

राज्यात या पाच अधिका-यांच्या बदल्या…नाशिक झेडपीच्या सीईओपदी या अधिका-याची नियुक्ती

ऑगस्ट 5, 2025
Screenshot 20250805 190544 WhatsApp 1

नाशिकमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पूर्वतयारीचा राज्य निवडणूक आयुक्तांनी घेतला आढावा

ऑगस्ट 5, 2025
IMG 20250805 WA0276 1

आंदोलनानंतर फुटलेल्या मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम बुधवारी सुरू होणार

ऑगस्ट 5, 2025
Rorr EZ Sigma Electric Red I 16 9

ओबेन इलेक्ट्रिकने नेक्स्ट-जेन रॉर ईझी सिग्मा लाँच केली…या तारखेपासून डिलिव्हरीला सुरुवात

ऑगस्ट 5, 2025
fir111

गिफ्ट हाऊसमध्ये बालकामगार, व्यावसायीकास पडले चांगलेच महागात…गुन्हा दाखल

ऑगस्ट 5, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011