नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिक जिल्हा रोलबॉल असोसिएशन नासिक यांच्या वतीने सिनियर गटाच्या (महिला आणि पुरूष) स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिकच्या हनुमानवाडी येथील श्रद्धा लॉन्स तेथे आयोजीत या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातील वीस जिल्ह्यातून ३५० खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. यामध्ये कोल्हापूर ,पुणे , अहमदनगर , सांगली,अकोला, बुलढाणा ,यवतमाळ, सातारा,ठाणे, मुंबई, नंदुरबार ,जळगाव ,नाशिक या जिल्ह्याचा समावेश असणार आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन सकाळी ११:३० वाजता नाशिक विभागाचे मा. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जेष्ठ सामाजिक नेते आणि संघटक सुरेश अण्णा पाटील हे भूषविणार आहेत. या कार्यक्रमासाठी रोलबॉल या खेळाचे जनक राजू दाभाडे, राज्य असोसिएशनचे अध्यक्ष संदीप खर्डीकर, सचिव प्रताप पगार, नाशिकचे प्रसिद्ध उद्योजक राहुल देशमुख, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील,मी.वि.प्र.चे शिक्षण अधिकारी डॉ. भास्कर ढोके, मुख्याध्यापिका श्रीमती मीनाक्षी गायधनी, नाशिक जिल्हा संघटनेचे अध्यक्ष संजय चव्हाण , सचिव बाळासाहेब रायते, खजिनदार छत्रपती पुरस्कार प्राप्त संजय होळकर, संघटनेचे उपाध्यक्ष साहेबराव वाकचौरे, सहसचिव सागर जानकर आदींची उपस्थिती असणार आहे.
या स्पर्धाच्या यशस्वी आयोजनासाठी महेश गोवर्धने, कैलास केदारे,रमेश कापडे ,पंकज केदारे अभिषेक व्यवहारे दिनेश सुराणा प्रतिक वाकचौरे आणि सर्व सहकारी परिश्रम घेत आहेत.