नाशिक – जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नाशिक यांच्यामार्फत 23 ते 27 ऑगस्ट दरम्यान महास्वयंम वेबपोर्टलवरून ऑनलाईन पध्दतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. बेरोजगार उमेदवारांनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या सहायक आयुक्त अलका तडवी यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
शासकीय प्रसिध्दी पत्रकात नमुद केल्यानुसार, कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सदर रोजगार मेळावा ऑनलाईन पध्दतीने घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ज्या उमेदवारांनी अद्यापर्यंत सेवा योजना नोंदणी केली नसेल अशा उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर किंवा अँण्ड्रॉईड मोबाईलधारकांनी प्ले स्टोअरमधून mahaswayam चे मोफत ॲप डाऊनलोड करून नोंदणी करावी. या पोर्टलवरील नोंदणीकृत उमेदवारांनी सदर केलेल्या पदानुसार आवश्यक कागदपत्रे व निकष पूर्ण करीत असल्यास त्या उमेदवारांची निवड नियुक्ती धारकांकडून भ्रमणध्वनीद्वारे मुलाखत घेवून करण्यात येणार असल्याचे सहायक आयुक्त अलका तडवी यांनी कळविले आहे.