सोमवार, जून 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

रोजगार संधी आणि वेतन वाढीत बंगळुर शीर्ष स्थानी…मुंबई, पुण्यातील सरासरी वेतन असे आहे

by India Darpan
नोव्हेंबर 11, 2024 | 11:32 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
Untitled 20

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नोकऱ्यांच्या बाबतीत बंगळूर आजही रोजगार संधी आणि वेतन वाढ देणारे भारताचे सर्वोच्च शहर म्हणून वर्चस्व गाजवत आहे. येथे मागील वर्षाच्या तुलनेत ९.३% वृद्धी निदर्शनास आली असून ही वाढ टेक्नॉलॉजी आणि व्यवसायाचे केंद्र म्हणून बंगळूरची जुनी ख्याती अधोरेखित करते. बंगळूरमधील सरासरी मासिक वेतन २९,५०० रुपये आहे. ही बाब भारताचा आघाडीचा स्टाफिंग समूह टीमलीझ सर्व्हिसेसच्या ‘जॉब्स अँड सॅलरीज प्राइमर रिपोर्ट’मधून निदर्शनास आली आहे. या अहवालाने हंगामी आणि स्थायी नियुक्ती बाजारपेठांमधील एकीकृत वेतनाचे विश्लेषण करून निवडक शहरे आणि उद्योगांतील कल कसा आहे याबाबत महत्त्वपूर्ण माहिती प्रदान केली आहे.

बंगळूर पाठोपाठ चेन्नई आणि दिल्लीचा क्रमांक येतो. येथे अनुक्रमे ७.५% आणि ७.३% इतकी मजबूत पगार वाढ आहे. यामधून या रोजगार बाजारपेठांचे स्पर्धात्मक स्वरूप दिसून येते. चेन्नईमधील सरासरी मासिक वेतन २४,५०० रुपये असून दिल्लीत ते २७,८०० रुपये इतके आहे. मुंबई आणि अहमदाबाद येथे देखील स्थिर वेतनवाढ दिसून आली ज्यामधून प्रमुख रोजगार केंद्रे म्हणून त्यांचे महत्व पक्के होते. मुंबईतील सरासरी वेतन २५,१०० रुपये आहे तर पुण्याचे सरासरी वेतन २४,७०० रुपये असून त्यांनी आपली स्पर्धात्मक वेतन पातळी सांभाळली आहे. या शहरांमध्ये वेतनवाढ ४% ते १०% या श्रेणीत आहे.

उद्योग आघाडीवर ८.४% वेतनवाढीसह सर्वश्रेष्ठ कामगिरी ‘रिटेल’ने केली आहे. हाच कल कन्झ्युमर ड्यूरेबल्स (५.२%) आणि बँकिंग आणि इतर सेवांमध्येही (५.१%) दिसून येतो तसेच या दोन्हींत व्यावसायिकांसाठी वृद्धीच्या दमदार संधी दिसत आहेत. दुसरीकडे, लॉजिस्टिक्स, एफएमसीजी, हेल्थकेअर आणि फार्मा, बांधकाम आणि रियल इस्टेट यांसारख्या क्षेत्रांत सामान्य वृद्धी दिसली आहे, जी कुशल व्यावसायिकांसाठीची त्यांची स्थिर मागणी दाखवते. सर्वाधिक वेतन देणाऱ्या उद्योगांमध्ये टेलिकम्युनिकेशन्स (२९,२०० रुपये), उत्पादन, इंजिनियरिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर (२८,२०० रुपये), हेल्थकेअर आणि फार्मा (२७,६०० रुपये) आणि बांधकाम आणि रियल इस्टेट (२७,००० रुपये) यांचा समावेश आहे.

टीमलीज सर्व्हिसेसच्या स्टाफिंग विभागाचे सीईओ कार्तिक नारायण म्हणाले, “हा अहवाल भारतातील रोजगार मार्केटमधील सकारात्मक चलन अधोरेखित करतो आणि विविध शहरे आणि उद्योगांत लक्षणीय पगार वाढ दर्शवितो. बंगळूरमधील ९.३% वेतनवाढ आणि रिटेलमधली दमदार ८.४% वाढ विशिष्ट कौशल्यांच्या वाढत्या मागणीकडे निर्देश करते. यामधून केवळ वेतन वृद्धीतील वाढ दिसत नाही, तर रोजगार मार्केटमध्ये होत असलेल्या सखोल बदलाचा अंदाजही येतो. कन्झ्युमर ड्यूरेबल्स आणि बांधकाम व रियल इस्टेट सारख्या क्षेत्रांमध्ये स्थायी आणि हंगामी नोकऱ्यांमधील वेतनातील अंतर कमी होणे दर्शविते की, कंपन्या प्रतिभेच्या समानतेवर आणि कर्मचाऱ्यांना दीर्घ काळ धरून ठेवण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत. हे कल भारतात कामाच्या भविष्याला आकार देण्यात अनुकूलता आणि कौशल्याचे वाढते महत्त्व अधोरेखित करत आहेत.”

हा अहवाल गेल्या पाच वर्षात नियमित वेतन वाढ देणाऱ्या काही विशिष्ट नोकऱ्यांवर देखील प्रकाश टाकतो. एफएमसीजी उद्योगात सर्वाधिक वृद्धी दिसते, ज्यात ट्रेनी असोसिएट आणि पायलट ऑफिसर या नोकऱ्यांसाठी अनुक्रमे ९.५% आणि ८% इतका जोरदार सीएजीआर आहे. त्याच्या पाठोपाठ बँकिंग आणि इतर उद्योगात एचआर एक्झिक्युटिव्ह्ज (७.९% सीएजीआर) आणि सेल्स मॅनेजर (६.६% सीएजीआर) यांना लक्षणीय दीर्घकालीन वृद्धी मिळालेली दिसते. शहरांचा विचार केल्यास, हैदराबाद येथे ऑपरेशन्स एक्झिक्युटिव्ह (८.१% सीएजीआर), अहमदाबादेत बॅक ऑफिस एक्झिक्युटिव्ह्ज (७.८% सीएजीआर), पुण्यात सेल्स मॅनेजर (६.८% सीएजीआर) आणि दिल्लीत डेटा कोऑर्डिनेटर (६.६% सीएजीआर) या विशिष्ट रोल्समध्ये चांगली वृद्धी दिसते आणि त्यातून उद्योग आणि शहरांत कुशल व्यावसायिकांची व्यापक मागणी प्रतिबिंबित होते.

तसेच, स्थायी आणि हंगामी रोल्ससाठी मिळणाऱ्या वेतनात समानता दिसते, खास करून कन्झ्युमर ड्यूरेबल्स, बांधकाम व रियल इस्टेट आणि अॅग्रिकल्चर व अॅग्रोकेमिकल्स यांसारख्या क्षेत्रात. या क्षेत्रांमध्ये वेतनातील फरक कमी आहे. कन्झ्युमर ड्यूरेबल्समध्ये हा फरक फक्त ६.३% आहे, बांधकाम व रियल इस्टेटमध्ये ७.८% आणि अॅग्रिकल्चर व अॅग्रोकेमिकल्समध्ये ७.९% तसेच रिटेलमध्ये ८.१% आहे.

भारताचे रोजगार मार्केट सतत बदलत आहे आणि २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठीचा ‘जॉब्स अँड सॅलरीज प्राइमर रिपोर्ट’ बँकिंग आणि अन्य, कन्झ्युमर ड्यूरेबल्स आणि एफएमसीजीसारख्या क्षेत्रांत विशिष्ट कौशल्यांची लवचिक मागणी, वेगवेगळ्या नोकऱ्यांमधील गतिशील वेतन वाढ आणि व्यावसायिकांसाठी अधिक उज्ज्वल भविष्य दर्शवितो.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या व्यक्तींचा आज खिसा भरलेला राहील, जाणून घ्या, मंगळवार, १२ नोव्हेंबरचे राशिभविष्य

Next Post

सोनसाखळी चोरट्यांचा धुमाकूळ…दोन घटनांमध्ये सव्वा दोन लाखाचे अलंकार चोरीला

India Darpan

Next Post
crime11

सोनसाखळी चोरट्यांचा धुमाकूळ…दोन घटनांमध्ये सव्वा दोन लाखाचे अलंकार चोरीला

ताज्या बातम्या

Untitled 75

नाशकात ही कंपनी करणार कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक…

जून 23, 2025
om birla arrival 1024x576 1

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे मुंबईत आगमन…असे आहे कार्यक्रम

जून 23, 2025
Screenshot 20250623 070829 Collage Maker GridArt 1

पंढरपूर सायकल वारी… ५००० हून अधिक सायकलस्वारांचा सहभाग, १० लाख किलोमीटरहून अधिक प्रवास

जून 23, 2025
Hydroponic4U163

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ११.८८ कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

जून 23, 2025
Gold1JIB2 e1750641367756

सोन्याच्या तस्करीप्रकरणी दोन विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक….

जून 23, 2025
IMG 20250622 WA0424 1

नाशिक रिंगरोडला मंजुरी, त्र्यंबक सहापदरी, द्वारका सर्कलचा दोन टप्यात विकास….मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत झाले हे निर्णय

जून 23, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011