इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बीडच्या खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडला केज न्यायालयाने १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. मंगळवारी रात्री उशीरा त्याला न्यायालयात आणण्यात आले. यानंतर झालेल्या युक्तीवादानंतर न्यायालयाने कोठडीचा निर्णय दिला. कराड पुण्यात सीआयडीसमोर शरण आला. तीन आठवड्यांपासून तो फरार होता. सीआयडीकडून आता त्याची कसून चौकशी सुरु केली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या होऊन २३ दिवस उलटले आहे. या प्रकरणातही वाल्मिक कराड यांचे नाव घेतले जात आहे. त्यामुळे या प्रकरणातही त्याची चौकशी केली जात आहे.
दरम्यान आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली असून त्यात त्यांनी म्हटले आहे की, बीड पोलीस स्टेशनमध्ये नवीन पाच पलंग मागवल्याच्या बातम्या आहेत, स्टाफसाठी नवीन पलंग मागवल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले असले तरी आजच अचानक पलंग कसे मागवले? असे अनेक प्रश्न आहेत.
नवीन पलंग स्टाफसाठी मागवले असतील तर एवढीच तत्परता राज्यभरातील सर्वच पोलीस स्टेशनमधील स्टाफसाठी दाखवायला हवी शिवाय गादी-उशी, पंखा, AC देखील बसवता येतील का, याचाही विचार करायला हवा.