इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील विजयी उमेदवारांना मिळालेली मते जवळपास सारखीच कशी? एका सामान्य नागरिकाने सदरील आकडेवारी पाठवत विचारलेला हा प्रश्न नक्कीच विचार करायला भाग पाडतो अशी पोस्ट करत आमदार रोहित पवार यांनी EVM वर संशय व्यक्त केला आहे.
त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे की, निवडणूक आयोग तर समोर येऊन काय खरं – काय खोटं हे सांगायला तयार नाही. आयोग नेमकं काय लपविण्याचा प्रयत्न करत आहे? की लोकशाहीला उद्ध्वस्त करण्याचा विडा आयोगाने उचलला आहे? या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे राज्यातील सामान्य जनतेला हवी आहेत…
तरी आयोग जनभावना लक्षात घेऊन लवकरच स्पष्टीकरण देईल, ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.