इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर आमदार रोहित पवार यांनी गंभीर आरोप केले आहे. त्यांनी विधानसभेत मंत्री बावनकुळे यांनी दिलेल्या उत्तरानुसार महसूल मंत्र्यांनी मेघा इंजिनिअरिंग कंपनीला केवळ दंडात बंपर डिस्काउंटच दिलेला नाही तर अवैध उत्खनन केल्याप्रकरणी प्रामाणिक अधिकाऱ्यांनी या कंपनीची जप्त केलेली वाहने, यंत्रसामुग्री तसंच डंपर सुद्धा या कंपनीला परत करण्याचे आदेश दिलेत, हे खरं आहे काय ?
रोहित पवार म्हणाले की, एकीकडे गावगाड्यात सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी पाणंद रस्त्यांसाठी किंवा गावकऱ्यांनी गावच्या सार्वजनिक कामांसाठी थोडाफार मुरूम काढला तर कडक कारवाई करणाऱ्या महसूल विभागाकडून मेघा इंजिनिअरिंगसाठी “बंपर डिस्काउंट सोबत डंपर रिटर्न” एवढी आकर्षक ऑफर आणि एवढी मेहरबानी का ?
एका दुसऱ्या प्रकरणात मेघा इंजिनिअरिंगने साताऱ्या जिल्ह्यातल्या सातारा ते म्हसवड रस्त्यातलं काम करत असताना देखील अवैध उत्खनन केलं असता स्थानिक तहसीलदार, प्रांताधिकारी यांनी या कंपनीला १०५ कोटींचा दंड ठोठावत या कंपनीची यंत्रसामुग्री जप्त करत बँक खाते देखील सील केलं होतं, परंतु दुर्दैवाने जून २०२२ मध्ये सरकार बदलताच डिसेंबर २०२२ मध्ये या कंपनीचा दंड माफ करत या कंपनीची यंत्रसामुग्री परत करण्याचा आदेश झाला.. हे ही खरं आहे काय ?
महसूल विभाग आणि मेघा इंजिनिअरिंगमध्ये असा कुठला बॉण्ड झाला ज्यामुळे एवढी मेहरबानी? बावनकुळे साहेब आपल्या उत्तराची वाट पाहतोय. शेवटी त्यांनी मी पुराव्याशिवाय बोलत नाही असेही सांगितले.