मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याची विधानसभा निवडणूक घोषित होण्याअगोदर राज्य सरकारने निर्णय घेण्याचा धडाका लावला आहे. त्याचबरोबरच जीआर व जाहीराती उदंड झाल्या आहे. या सर्व कृतीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी जोरदार टीका केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकत आता कर्मचा-यांचे पगार होती की नाही अशी शंका उपस्थितीत केली आहे.
या पोस्टमध्ये रोहित पवार यांनी म्हटले आहे, केवळ निवडणुका समोर ठेवून मंत्रिमंडळ बैठकीत घेतले जाणारे निर्णय, GR, आणि जाहिराती बघता आता पगारही होतील की नाही अशी चर्चा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये दबक्या आवाजात सुरू असून या महिन्याच्या पगाराची तर आशासुद्धा सर्वांनी सोडलीय. सहकारी पक्षांची आर्थिक बेशिस्त आणि हवेतल्या घोषणांना कंटाळून कालच्या मंत्रिमंडळ बैठकीतून अर्थमंत्री तर पहिल्या दहाच मिनिटात उठून निघून गेले.
डबघाईला आलेला महाराष्ट्र आणि महाराष्ट्राची होत असलेली वाताहात बघून दिल्लीतील गुजरातचे नेते मात्र नक्कीच मनोमन खूष झाले असतील!